Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

धक्कादायक! You Tuber ज्योतीकडून 'लालबागचा राजा'चीही रेकी; मुंबईतील अनेक व्हिडीओ, Locations मिळाल्यानं खळबळ

YouTuber Jyoti Malhotra Visited Mumbai : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या रडारवर मुंबई असल्याचीही माहिती. लालबागच्या राजाचीही ज्योतीकडून रेकी..  

धक्कादायक! You Tuber ज्योतीकडून 'लालबागचा राजा'चीही रेकी; मुंबईतील अनेक व्हिडीओ, Locations मिळाल्यानं खळबळ

YouTuber Jyoti Malhotra Visited Mumbai : भारत- पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीमध्ये भारतात तपास यंत्रणांनी अधिक कठोर कारवाई करत पाकच्या गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी करणाऱ्या भारतातील हेरांचा पर्दाफाश केला आहे. यातच युट्यूबर ज्योती मल्होत्रा या हरियाणाच्या कंटेंट क्रिएटरचंही नाव समोर आलं. गेल्या काही दिवसांपासून ज्योतीचं पाकिस्तान कनेक्शन उघडकीस येत असून, देशाची आर्थिक राजधानी अर्थात मुंबईसुद्धा आता तिच्या रडारवर असल्याची बाब समोर आल्याचं म्हटलं जात आहे. 

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरू असणाऱ्या ज्योतीच्या चौकशीदरम्यान अतिशय खळबळजनकरित्या ही माहिती हाती लागली असून, ज्योतीनं अनेकदा मुंबईत भेट दिली असून, इथं तिनं बऱ्याचदा शहरातील विविध आणि संवेदनशील भागांचे व्हिडीओसुद्धा शूट केल्याचं उघडकीस आलं. 

लालबागच्या राजाचीही रेकी... 

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राने मुंबईतील लालबागच्या राजाच्या गर्दीचेही व्हिडीओ काढल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे. आयएसआयसाठी कथित स्वरुपात हेरगिरी करणारी ज्योती मल्होत्रा मुंबईत आली होती आणि इथं तिने लालबागच्या राजाच्या गर्दीचे व्हिडीओ काढले होते. (Lalbaugcha Raja Mumbai)

उपलब्ध माहितीनुसार तिने चार वेळा मुंबई दौरा केल्याची माहिती समोर येत असून त्यामुळं आता मुंबईसुद्धा ज्योतीच्या आणि पर्यायाने पाकिस्तानच्या रडारवर असल्याचं म्हटलं गेलं. याचदरम्यान तिच्याकडे असणारे मुंबईचे व्हिडीओसुद्धा माध्यमांच्या हाती लागल्यानं एकच खळबळ माजली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार ज्योतीनं आतापर्यंत ज्योतीन तीन ते चार वेळा मुंबईत भेट दिली असून या प्रवासात तिनं ट्रेन आणि लक्झरी बसनं प्रवास केला. ती ऑगस्ट 2024 मध्ये पहिल्यांदाच मुंबईला अहमदाबाद- मुंबई अशा प्रवासातून कर्णावती एक्स्प्रेसच्या माध्यमातून पोहोचली होती. या प्रवासादरम्यान तिनं अनेक व्हिडीओ रेकॉर्ड केले जिथं तिनं रेल्वे स्थानकं आणि इतर माहिती रेकॉर्ड केली. 

पुढे ज्योती सप्टेंबर 2024 मध्ये मुंबईत आली, जेव्हा तिनं 12138 दिल्लीहून पंजाब मेलनं प्रवास करत हे शहर गाठलं. आश्चर्याची बाब म्हणजे तिच्या एका व्हिडीओमध्ये पंजाब मेल कधीएकेकाळी पेशावरपर्यंत जोडली गेली होती असा उल्लेखही केल्याचं आढळतं. 2023 मध्ये ज्योतीनं मुंबईच्या गणेशोत्सवाची रेकी करत लालबागचा राजा या गणेशोत्सव मंडळालाही भेट दिली होती. प्रचंड गर्दी, स्थानिक ठिकाणं, प्रवेश आणि निकासाचे मार्ग आणि आजुबाजूचा परिसर अशी बरीच संवेदनशील माहिती ज्योतीनं तिच्या लालबागच्या व्हिडीओमध्ये रेकॉर्ड केल्याचं पाहायला मिळालं, ज्यामुळं आता शहरातील बहुतांश भागांमध्ये सुरक्षेचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, तिथं तपास यंत्रणा ज्योतीची कसून चौकशी करत असल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान आता तपास यंत्रणांकडून या प्रकरणात कोणती अधिकृत माहती दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Read More