Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार

महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस या संघटनेने पुन्हा एकदा एसटीच्या संपाचा इशारा दिला आहे.

एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार

मुंबई : महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस या संघटनेने पुन्हा एकदा एसटीच्या संपाचा इशारा दिला आहे. दिवाळीतील एसटी च्या सापानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वेतनवाढीबाबत उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती. 

जुजबी वेतनवाढीची शिफारस

या समितीने अहवाल उच्च न्यायालायात नुकताच सादर केला. या अहवालात अत्यंत जुजबी वेतनवाढीची शिफारस करण्यात आल्याचा आरोप वर्कर्स संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी केला आहे.

अचानक पुकारलेल्या संपाने हाल

यापूर्वी एसटीने अचानक पुकारलेल्या संपाने प्रवाशांचे खूप हाल झाले होते, दिवाळीच्या काळात एसटीने संप पुकारला होता, प्रवाशांच्या सोयीसाठी खासगी बसेसची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला गेला, पण तो तोडका पडला.

Read More