Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

राज्य मंत्रीमंडळ बैठकीत शिवसेनेकडून CMना अडचणीत आणण्याचा प्रयत्न

राज्य मंत्रिमंडळच्या बैठकीत आज शिवसेनेच्या तीन मंत्र्यांनी पहिल्यांदाच एकत्र येत मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. 

राज्य मंत्रीमंडळ बैठकीत शिवसेनेकडून CMना अडचणीत आणण्याचा प्रयत्न

दीपक भातुसे, मुंबई : राज्य मंत्रिमंडळच्या बैठकीत आज शिवसेनेच्या तीन मंत्र्यांनी पहिल्यांदाच एकत्र येत मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. 

उद्योग विभागाला माहिती नाही!

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महामुंबई एसईझेड रद्द करून त्या ठिकाणी आयआयए म्हणजेच एकत्रित औद्योगिक क्षेत्र उभारण्याबाबतचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळ बैठकीत आला होता. 
नगरविकास विभागाने हा प्रस्ताव आणला होता. मात्र औद्योगिक क्षेत्र उभे राहणार असल्याने उद्योग विभागाला याबाबतची सविस्तर माहिती मिळायला हवी, अशी मागणी उद्योगमंत्री म्हणून सुभाष देसाई यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. 

नगरविकास विभागाने महामुंबई एसईझेड रद्द होऊन त्या जागी उभ्या राहणाऱ्या आयआयएमध्ये कोणकोणते उद्योग उभे राहणार आहेत याची माहिती द्यावी, अशी मागणीच सुभाष देसाई यांनी नगरविकास विभागाकडे केली. 

रामदास कदम यांची भूमिका

नगरविकास विभाग हा मुख्यमंत्र्यांकडे असल्याने ही मागणी करून देसाई यांनी मुख्यमंत्र्यांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचं समजतंय. देसाई यांची ही मागणी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उचलून धरली. 

निर्णयावर सेनेचा आक्षेप

ज्या खात्याचा विषय असतो तो त्या खात्याकडे न येता परस्पर मंत्रिमंडळ बैठकीत येत असल्याचं आक्षेप रामदास कदम यांनी घेतला. दिवाकर रावते यांनीही त्याला दुजारो दिला. 

Read More