Stock Market Holidays 2025 : महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण देश शिव शंकराच्या भक्तीत रममाण असणार आहे. त्या दिवशी शेअर बाजार सुरु असणार की नाही याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 26 फेब्रुवारी 2025 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पूर्णपणे बंद असणार आहे. दोन्ही एक्सचेंजवर कोणताही व्यवहार होणार नाही. हिंदु पंचागानुसार, माघ महिन्यात महाशिवरात्री उत्साहात साजरी केली जाते.
शेअर बाजारात काम करणारे लोक सतत गुगलवर शोधत असतात की महाशिवरात्रीच्या दिवशी बाजारात व्यवहार होतील की नाही? तर उत्तर असे आहे की भारतीय शेअर बाजार या दिवशी बंद असेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी पुन्हा उघडेल. आज, मंगळवारी शेअर बाजारात हलका हिरवा रंग दिसून येत आहे. निफ्टी सुमारे 15 अंकांनी वाढून 2258.50 वर पोहोचला, तर सेन्सेक्स 180.88 अंकांनी वाढून 74635.29 वर पोहोचला. जागतिक बाजारपेठेत कमकुवतपणाची चिन्हे दिसून आली.
2025 मध्ये, महाशिवरात्रीनंतर, 14 मार्च रोजी होळी आणि 31 मार्च रोजी ईद-उल-फित्रच्या आनंदात बाजारात सुट्टी असेल. एप्रिल महिना हा उत्सवांचा मेळा असेल. या महिन्यात, महावीर जयंती 10 तारखेला, बाबा साहेब आंबेडकर जयंती 14 तारखेला आणि गुड फ्रायडे 18 तारखेला आहे. या तीन दिवसांत शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. त्यानंतर मे महिन्यात 1 तारखेला महाराष्ट्र दिन आहे आणि त्या दिवशीही बाजारात काम नसेल.
ऑगस्टमध्ये, 15 तारखेला स्वातंत्र्यदिनाचा उत्सव आणि २७ तारखेला गणेश चतुर्थीचा उत्साह बाजारपेठेला विश्रांती देईल. वर्षाच्या शेवटच्या भागात 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आणि दसरा, 21-22 ऑक्टोबरला दिवाळी, 5 नोव्हेंबरला प्रकाश गुरुपर्व आणि 25 डिसेंबरला ख्रिसमस असतो. या दिवसांतही शेअर बाजारात व्यवहार होणार नाहीत.
भारतीय शेअर बाजार सकाळी 9.15 वाजता उघडतो आणि दुपारी 3.30 वाजता बंद होतो. सकाळी 9.15 वाजता बाजार उघडण्यापूर्वी, प्री-ओपनिंग सत्र सकाळी 9 वाजता सुरू होते. शनिवार आणि रविवार दोन्ही दिवशी बाजार बंद असतो. बहुतेक बाजारपेठांमध्ये सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व्यवहार होत नाहीत.