मुंबई : सामनाकार शिवसेना नेत्यांनी सुशांत आणि सुशांतच्याया कुटुंबाला बदनाम आणी अपमानित करण्याची सुपारी घेतल्याच दिसतंय? असा आरोप भाजप नेते राम कदम यांनी लावला आहे. सुशांतच्या आत्महत्येला आता तीन महिने झाले आहेत. अजून हा गुंता सुटलेला नाही. AIIMS च्या रिपोर्टनुसार सुशांतची आत्महत्या झालेली आहे. आता नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो या प्रकरणातील ड्रग्स कनेक्शन तपासून पाहत आहेत. या दरम्यान भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेना सुशांतच्या मृत्यूनंतरही त्याच्या विरोधातही अपमान करणारी वक्तव्य करत आहेत.
1/1 सामनाकार शिवसेना नेत्यांनी #सुशांत आणि सुशांतच्याया कुटुंबाला बदनाम आणी अपमानित करण्याची सुपारी घेतल्याच दिसतय ?
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) October 5, 2020
74 वर्षाच्या म्हाताऱ्या #सुशांतच्या वडीलाना आणी कूटूबीयाना वारंवार #शिवसेना नेत्यांनी अपमानित केलं @rautsanjay61 @CMOMaharashtra
७४ वर्षांच्या म्हाताऱ्या सुशांतच्या वडिलांना आणी कुटुंबियांना वारंवार शिवसेना नेत्यांनी अपमानित केलं. आता देवाघरी गेलेल्या सुशांतला देखील मेल्यानंतर सुद्धा शिवसेना नेते बरे वाइट बोलायला मागेपुढे पाहत नाहीत. अत्यंत वाईट शब्दात अपमानित करतात मृत्युनंतर शत्रूला देखील बरं वाईट बोलू नये हां हिंदू धर्मातला संस्कार शिवसेना नेते सामनाकार राजकारणाच्या स्वार्थापोटी विसरले दुद्रैव !
1/2 देवाघरी गेलेल्या #सुशांतला देखील मेल्यानंतर सुद्धा शिवसेना नेते बरे वाइट बोलायला मागेपुढे पाहत नाहीत
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) October 5, 2020
अत्यत वाईट शबदात अपमानित करतात मृत्युनंतर शत्रूला देखील बरं वाईट बोलू नये हां हिंदू धर्मातला संस्कार शिवसेना नेते सामनाकार राजकारणाच्या स्वार्थापोटी विसरले @rautsanjay61
सीबीआयचा तपास अजून पूर्ण झाला नाही त्याच्या आधीच आत्मसाक्षतकार आशीर्वाद प्राप्त झालेले #MVA सरकार आणि शिवसेना नेते सुशांतबाबतीत चौकशी पूर्ण होण्या आधिच निष्कर्षापर्यंत येतात याचं आश्चर्य कमी पण त्यांंना कुणाला वाचवायचं आहे? हा प्रश्न अधिक पडतो, असं ट्विट आमदार राम कदम यांनी केले आहे.
1/3 सामनाकार स्वार्थापोटी विसरले दुद्रैव ! #CBI तपास अजून पूर्ण झाला नाही त्याच्या आधीच आत्मसाक्षतकार आशीर्वाद प्राप्त झालेले #MVA सरकार आणि शिवसेनानेते #SSR बाबतीत चोकशी पूर्ण होन्या आधिच निष्कर्षापर्यंत येतात याचं आश्चर्य कमी पण त्याना कुणाला वाचवायचं आहें? हा प्रश्न अधिक पडतो
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) October 5, 2020
राम कदम घाटकोपरच्या आमदार असून त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना सवाल करताना मुंबई पोलिसांवर निशाणा साधला आहे. कदम यांनी मुंबई पोलिसांना ड्रग्स कनेक्शनकडे दुर्लक्ष का केल्याचा आरोप केला आहे.