Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

आताची स्थिती आणीबाणीपेक्षा गंभीर - पुरोगामी संघटना

पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा निषेध करत २०पेक्षा जास्त पुरोगामी संघटनांनी मुंबई पत्रकार परिषद घेतली.

आताची स्थिती आणीबाणीपेक्षा गंभीर - पुरोगामी संघटना

मुंबई : पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा निषेध करत २०पेक्षा जास्त पुरोगामी संघटनांनी मुंबई पत्रकार परिषद घेतली. ही स्थिती आणीबाणीपेक्षा गंभीर असल्याचा आरोप करत अटक केलेल्या कार्यकर्त्यांची त्वरित सुटका करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

एल्गार परिषदेचं आयोजन माजी न्या. पी.बी. सावंत आणि आपण केल्याचं माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी सांगितलं. कोरेगाव भीमा दंगलीला संभाजी भिडे आणि एकबोटे जबाबदार असल्याचा अहवाल असताना सरकारला ते मान्य नाही. पुरोगामी नेत्यांच्या हत्यांमध्ये सनातनच्या प्रमुखांपर्यंत धागेदोरे पोहोचत असल्यानं त्यापासून लक्ष हटवण्यासाठी कालचं अटकसत्र करण्यात आल्याचा आरोपही कोळसे पाटील यांनी केलाय. 

Read More