Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

राणा दाम्पत्याला आज दिलासा नाहीच, कोठडीतला मुक्काम वाढला

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय होणार होता  

राणा दाम्पत्याला आज दिलासा नाहीच, कोठडीतला मुक्काम वाढला

मुंबई :  खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालय निकाल देणार होतं. पण वेळेअभावी आज न्यायालयाने आज निर्णय दिला नाही. आता त्यांच्या जामीन अर्जावरचा निकाल बुधवारी होणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला आणखी दोन दिवस कोठडीतच रहावं लागणार आहे. 

आज राणा दाम्पत्याला बेल मिळणार की जेलमध्येच राहावं लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण निकाल राखून ठेवल्याने आजही राणा दाम्पत्याला दिलासा मिळालेला नाही.

मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर समाजात तेढ निर्माण करणे आणि राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत असून जामिनासाठी त्यांनी गेल्या आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केल होता.

Read More