Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईतलं तापमान घटलं, इतके दिवस थंडी जाणवण्याची शक्यता

 मुंबईतील कमाल तापमान चार अंशाने घटलंय.

मुंबईतलं तापमान घटलं, इतके दिवस थंडी जाणवण्याची शक्यता

मुंबई : मुंबईतील कमाल तापमान चार अंशाने घटलंय.. गेल्या शुक्रवारपासून मुंबई शहर आणि उपनगरातील कमाल तापमानात सहा अंशाची वाढ झाली होती मात्र पुन्हा एकदा गुरुवारी तीन ते चार अंशाची घट नोंदविण्यात आली.

राज्यात येत्या  2 ते 3 दिवसात हिवाळा जाणवण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याचा काही भागा किमान तापमानात घट होणार आहे. हवामान विभागाने यासंदर्भा अंदाज वर्तवला आहे. 

सध्या राज्यात मध्येच थंडी, मध्येच गरम असे वातावरण आहे. पुढ्च्या दोन ते तीन दिवसात पुन्हा एकदा थंडी जाणवणार आहे. मुंबईतील कमाल तापमान चार अंशाने कमी झालंय. गेल्या शुक्रवारपासून मुंबई शहर आणि उपनगरातील कमाल तापमानात सहा अंशाची वाढ झाली होती. 

आता या आठवडय़ात तापमानात वाढ होण्याची शक्यता नसून, सरासरीपेक्षा एक ते दोन अंश तापमान कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविले आहे. त्यामुळे मुंबईकरांना मध्येच जाणवत असलेला उष्मा थोडा कमी होण्याची शक्यता आहे. तर पुण्यातही निचांकी तापमान आहे.

Read More