Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

धक्कादायक ! पोलीसच चोर, दरोडेखोर निघाला

कोरोना  विरोधातील लढ्यात पोलीस बांधव आपल्या जीवावर होऊन काम करीत असतानाच त्यांच्यातील एकाने मात्र पोलिसांची मान खाली घातली आहे.  

धक्कादायक ! पोलीसच चोर, दरोडेखोर निघाला

मुंबई : कोरोना  विरोधातील  लढ्यात पोलीस बांधव आपल्या जीवावर होऊन काम करीत असतानाच त्यांच्यातील एकाने मात्र पोलिसांची मान खाली घातली आहे. संतोष बाबुराव राठोड या पोलिसाने सुमारे सात कोटी रुपयांच्या ऐवजाची चोरी केल्याची घटना समोर आली असून त्याच्या घरातून ८० लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. ही घटना समोर आल्याने संपूर्ण पोलीस दलात खळबळ माजली आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कारखान्यत चोरी झाल्याची घटना ६ एप्रिल रोजी नीरज इंडस्ट्रीत या गोल्ड मेकिंग कंपनीत घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी प्रथम  सात आरोपीना अटक केली. यांची चौकशी केली असता या गुन्ह्यात पोलीस सेवेत असलेल्या संतोष बापूराव राठोड याने  सहा ते सात लोकांचे मदतीने या कारखान्याच्या वरील  सिमेंटचे पत्रे काढून प्रवेश केला आणि सुमारे सात कोटीं पेक्षा जास्त ऐवजाची चोरी केली हे उघड झाले आहे.

या गुन्ह्यातील पाच आरोपींना सीसीटीव्हीच्या आधारे अटक केली. त्यानंतर अधिक चौकशी आणि पाहणी केली असता पोलीस दलात सेवेत असलेला संतोष राठोड हा यात सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या घराची झडती घेतली असता  ८० लाख रुपयांचा मुद्देमाल त्याच्या घरातून हस्तगत केला आहे. तर  या गुन्ह्यांमधील ७.५ कोटींपैकी ६ कोटी १७ लाखांचा माल हस्तगत  करण्यात आला आहे.

संतोष राठोड यांला ओरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. राठोड हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात सेवत रुजू होता. त्याला या कारखान्याची सगळी माहिती होती आणि त्याचा त्याने गैरफायदा घेतला आहे, असे पोलिसांनी सांगितले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहे.

Read More