Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

3240 शाखा असलेल्या 'या' प्रसिद्ध बँकेला ₹699.52 कोटींची नोटीस; इथं तुमचं खातं तर नाही ना?

Rs 699 Crore Notice: ही नोटीस मिळाल्यानंतर बँकेने आपली भूमिका स्पष्ट केली असून नेमकं काय प्रकरण आहे जाणून घ्या. तसेच याचा ग्राहकांना फटका बसणार का? हे ही जाणून घ्या.

3240 शाखा असलेल्या 'या' प्रसिद्ध बँकेला ₹699.52 कोटींची नोटीस; इथं तुमचं खातं तर नाही ना?

Rs 699 Crore Notice: सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँकेला (आयओबी) तब्बल 699 कोटी 52 लाख रुपयांची नोटीस पाठवण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 साठीचा जीएसटी बाकी असल्याने चेन्नईमधील लार्ज टॅक्सपेअर्स युनिटच्या उपायुक्तांनी ही नोटीस पाठवली आहे. 27 फेब्रुवारी 2025 रोजी ही नोटीस पाठवण्यात आली असून मूळ जीएसटी रक्कम भरण्यात दिरंगाई केल्याने 35 कोटी 26 लाख रुपयांच्या दंडाच्या रक्कमेचाही यामध्ये समावेश आहे.

कायदेशीर मार्गाने लढणार

जीएसटी फायलिंगसंदर्भातील चाचपणीदरम्यान अधिकाऱ्यांना रक्कमेमध्ये तफावत दिसून आली. त्यानंतरच बँकेला नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र बँकेने या प्रकरणामध्ये कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच ही नोटीस कायद्याच्या चौकटीत बसणारी नसल्याचंही बँकेने म्हटलं आहे. आयओबीने या प्रकरणात कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. ही नोटीस परत मागे घेतली जाईल असा विश्वास बॅकेला आहे. 

बँकाचा एकूण नफा 875 कोटी 27 लाख रुपये

आर्थिक वर्ष 2025 च्या ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यानच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये वार्षिक तत्वावर 21 टक्के अधिक नफा कमवला आहे. बँकाचा एकूण नफा 875 कोटी 27 लाख रुपये इतका आहे. मागील वर्षी हीच रक्कम 724 कोटी 14 लाख रुपये इतकी होती. या तिमाहीमध्ये बँकेने 7 हजार 115 कोटी 88 लाख रुपयांची रक्कम व्याज म्हणून मिळवल्याचं म्हटलं आहे. ही रक्कम 24 च्या तिसऱ्या तिमाहीत कमावलेल्या रक्केमपेक्षा 15 टक्के अधिक आहे. बँकेच्या एकूण कमाईमध्येही मागील वर्षाच्या तुलने 13 टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण कमाई 8415 कोटी 34 लाख रुपये इतकी आहे. 

सरकारचा मालकी हक्क 96.38 टक्के

डिसेंबरच्या शेवटपर्यंत भारत सरकारने इंडियन ओव्हरसीज बँकेतील मालकी हक्काचा 96.38 टक्के वाटा स्वत:च्या ताब्यात घेतला आहे. डिसेंबर महिन्यामध्येच बँकेला 1359 कोटी 29 लाख रुपयांचा आयकर परतावा मिळाल्याचं समोर आलं आहे. सन 2015-16 सालातील हा परतावा असून तो सेक्शन 244 अ अंतर्गत देण्यात आला आहे. 

बँकेच्या शेअर्सची किंमत तळाशी

दरम्यान, दुसरीकडे आयओबीचे शेअर्स 4 टक्क्यांनी पडले आहे. वर्षभरातील सर्वात निच्चांकी स्तराला या बँकेचे शेअर्स असून या शेअर्सचा दर 43.68 रुपये प्रती शेअर इतका आहे. शुक्रवारी शेअर बाजारात झालेल्या अभूतपूर्व घसरणीमध्ये एकूण 908 कंपन्यांचे शेअर्स वर्षभरातील निच्चांकी स्तरावर पोहोचले त्यात या बँकेचाही समावेश होता.

ग्राहकांवर, सेवांवर या जीएसटी नोटीसचा परिणाम होणार?

बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर, कारभाराव आणि उद्योगावर या एवढ्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या जीएसटी करभरणीच्या मागणीचा काही परिणाम होणार नसल्याचा विश्वास बँक व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. यामधून ग्राहकांनी निश्चिंत रहावं असं सूचित करण्याचा प्रयत्न बँकेने केला आहे. या बँकेच्या देशभरामध्ये 3240 शाखा कार्यरत असल्याचं 24 मे 2024 च्या आकडेवारीमध्ये म्हटलं होतं. यंदाच्या आर्थिक वर्षात 88 नवीन शाखा सुरु करण्याचा बँकेचा मानस आहे.

 

Read More