मुंबई : शहरातील पवईमध्ये क्रेन कोसळून तीन जण ठार झाले आहेत. तर दोन जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या नाल्याचं काम सुरु असताना ही दुर्घटना घडली.