Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

पैशासाठी वेश्याव्यवसायाच्या नर्कात ढकलले! 4 लाखात 16 वर्षाच्या मुलीचा केला सौदा

पैशासाठी कोण काय करेल याचा भरवसा नाही. एका लहान मुलीला वेश्याव्यवसायाच्या नर्कात ढकलायचे पापदेखील करताना महिलेला काही वाटत नसावे का?

 पैशासाठी वेश्याव्यवसायाच्या नर्कात ढकलले! 4 लाखात 16 वर्षाच्या मुलीचा केला सौदा

वसई : पैशासाठी कोण काय करेल याचा भरवसा नाही. एका लहान मुलीला वेश्याव्यवसायाच्या नर्कात ढकलायचे पापदेखील करताना महिलेला काही वाटत नसावे का? मानुसकी आणि नात्याला काळीमा फासणारी अशीच ही घटना म्हणावी लागेल.

वसईत 35 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. तिने अल्पवयीन 16 वर्षाच्या  मुलीला देहव्यापारात ढकलल्याचा आरोप आहे. पालघर पोलिसांनी याप्रकरणी सापळा रचून महिलेला अटक केली आहे.

पोलिसांना एका गैरसरकारी संस्थेने माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी माहिती काढली. तर एका बारमध्ये काम करणारी 35 वर्षीय महिला आपल्या पोटच्या 16 वर्षीय मुलीला 4 लाख रुपयांत विकण्यास तयार झाली होती. 

NGO च्या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचला महिलेला दलालाशी सौदा करताना रंगे हात अटक केली. त्यानंतर मुलीची सूटका करण्यात आली. महिलेवर आयपीसी आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More