Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'महाविकासआघाडी'च्या शक्तीप्रदर्शनात होते एवढे आमदार

महाविकासआघाडीचं 'आम्ही १६२'

'महाविकासआघाडी'च्या शक्तीप्रदर्शनात होते एवढे आमदार

मुंबई : महाविकासआघाडीने मुंबईतील ग्रॅंड हयात मध्ये 'आम्ही १६२' या सोहळ्याअंतर्गत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या कार्यक्रमात १६२ आमदार उपस्थित असल्याचा दावा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. पण भाजपच्या नेत्यांनी हा दावा फेटाळून लावला. तिकडे १४५ आमदार तरी होते का? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला. तर महाविकासआघाडीचे फक्त १३७ आमदारच तिकडे होते, असा गौप्यस्फोट नारायण राणेंनी केला आहे.

एकीकडे हे सगळे आरोप-प्रत्यारोप होत असताना शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी कार्यक्रमात नेमके किती आमदार होते हे सांगितलं आहे. 'ज्यांना त्या कार्यक्रमात किती आमदार होते यात स्वारस्य आहे त्यांच्यासाठी, ग्रॅंड हयातमध्ये एकूण १५८ आमदार उपस्थित होते. राष्ट्रवादीचे झिरवळ नुकतेच पोहोचले होते. धर्मराव अत्राम रुग्णालयात आहेत, पण ते संपर्कात आहेत. काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण दिल्लीमध्ये आहेत. सुनील केदार हे नागपूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गेले आहेत,' असं ट्विट प्रियंका चतुर्वेदी यांनी केलं आहे. 

Read More