Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

ST Bus Strike : देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्याने एसटीचा तिढा सुटणार?

परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

ST Bus Strike : देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्याने एसटीचा तिढा सुटणार?

मुंबई : विलीनीकरणाच्या मुद्द्यावर राज्यातील एसटी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून संपावर आहेत. राज्य सरकारने आवाहन केल्यानंतरही संपकरी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

फडणवीस-परब भेट

यासंदर्भात परिवहिन मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी काही सूचना केल्याची माहिती अनिल परब यांनी बैठकीनंतर दिली. देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री होते, त्यांनाही राज्याचा कारभार माहित आहे, त्यांनी केलेल्या सूचनांवर विचार करु, त्यावर शासनाचं मत घेऊन निर्णय घेऊ, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

एसटी कर्मचाऱ्यांच्याबाबतीतला तिढा अजून सुटलेला नाही. आज पुन्हा आवाहन केलं आहे. विलीनीकरणाचा जो मु्द्दा आहे तो समितीसमोर आहे. याशिवाय इतर जे प्रश्न आहे त्यासाठी चर्चेसाठी शासनाची तयारी असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. सरकारची एसटी कर्मचाऱ्यांबाबत नकारात्मक भूमिका नाही असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, एसटी कामगारांना वेतनवाढ द्यायला तयार असल्याचंही अनिल परब यांनी म्हटलं आहे. एसटी कामगारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्रीच निर्णय घेतील असंही अनिल परब यांनी सांगितलं. 

Read More