Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईत झाडाची फांदी पडून एकाचा मृत्यू

मुंबईतील आझाद मैदानाजवळ झाडाची फांदी पडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय.

मुंबईत झाडाची फांदी पडून एकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील आझाद मैदानाजवळ झाडाची फांदी पडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. तर चार जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमी असलेल्या रुग्णावर जीटी रुग्णालयात आयसीयूत उपचार सुरू आहेत. सायंकाळी घराकडे परतणाऱ्या तसेच खाद्यपदार्थाच्या स्टॉलजवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तींवर ही फांदी पडली. मुंबईत आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. मुंबईत पावसाळ्यात झाडं तसेच फांद्या पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असतात. 

Read More