Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईत झाडाची फांदी कोसळून एकाचा मृत्यू, यंदाच्या पावसातली पहिलीच दुर्घटना

अंगावर झाडाची फांदी कोसळल्यानंतर उपस्थित लोकांनी त्याला तातडीनं कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केलं

मुंबईत झाडाची फांदी कोसळून एकाचा मृत्यू, यंदाच्या पावसातली पहिलीच दुर्घटना

मुंबई : मुंबईच्या मालाडमध्ये झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झालाय. आज सकाळी साडे सहा वाजता ही घटना घडलीय. शैलेश राठोड असं ३८ वर्षीय मृत व्यक्तीचं नाव आहे. मालाड पश्चिमेतल्या नरियाल वाला कॉलनी, विजयकरवाडीमध्ये ही घटना घडलीय. 

शैलेशच्या अंगावर झाडाची फांदी कोसळल्यानंतर उपस्थित लोकांनी त्याला तातडीनं कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केलं. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

यंदाच्या पावसाळ्यातील झाड पडून मृत्यू होण्याची ही पहिलीच दुर्घटना आहे. गेल्या दोन दिवसांत रिमझिम पावसासहीत सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यात मुंबईत ७६ ठिकाणी झाडं किंवा झाडांच्या फांद्या तुटल्याची माहिती मिळतेय. मुंबईत गुरुवारी १०.३३ मिमी, पूर्व उपनगरांत १०.५९ मिमी तर पश्चिम उपनगरात ७.४६ मिमी पावसाची नोंद झाल्याचं पाहायला मिळालं.

Read More