Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुलुंडमध्ये चालत्या रिक्षावर कोसळली झाडाची फांदी, दोघांचा मृत्यू

 मुलुंड कॉलनीतील हिंदुस्थान चौकात ही घटना घडली. 

मुलुंडमध्ये चालत्या रिक्षावर कोसळली झाडाची फांदी, दोघांचा मृत्यू

मुंबई: मुलूंड परिसरात मंगळवारी दुपारी रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षावर झाडाची फांदी कोसळल्याचा प्रकार घडला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. मुलुंड कॉलनीतील हिंदुस्थान चौकात ही घटना घडली. येथील रस्त्यावरुन एक रिक्षा प्रवाशांना घेऊन जात होती. यावेळी अचानकपणे रस्त्यालगत असणाऱ्या झाडाची फांदी तुटून या रिक्षावर कोसळली. यामध्ये रिक्षातील प्रवाशी जखमी झाले. यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचे समजते. 

पावसाळा सुरु झाल्यापासून मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी दादर येथे झाड कोसळून एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले होते. तत्पूर्वी दहिसरमध्येही १४ वर्षीय मुलीच्या अंगावर झाड पडून तिचा मृत्यू झाला होता. यावरून स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले होते. 

Read More