मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करत असतात. इतकंच नाही तर शिवसेना (shivsena) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करण्याची एकही संधी त्या सोडत नाहीत.
आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांनी केलेलं एक ट्विट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा एक फोटो त्यांनी शेअर केल आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
या फोटोसोबत त्यांनी कॅप्शन दिलं आहे 'ये दोस्ती हम नही तोड़ेंगे ……….महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत ….' अमृता फडणवीस यांचं हे ट्विट चांगलच व्हायरल होत आहे. हे ट्विट अमृता फडणवीस याी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं असून यासोबत #FriendshipDay2022 #Friends #friendship #FriendsForever #sundayvibes हे हॅशटॅग वापरले आहेत.
ये दोस्ती हम नही तोड़ेंगे ……….
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) August 7, 2022
महाराष्ट्राच्या दोन अनमोल रत्नांसोबत ….@mieknathshinde @Dev_Fadnavis #FriendshipDay2022 #Friends #friendship #FriendsForever #sundayvibes #Maharashtra pic.twitter.com/SZb4bKojSc
मंत्रीमंडळ विस्तारचा मुहूर्त कधी?
राज्यात सत्तास्थापनेच्या महिन्यानंतरही मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार रखडलेला आहे. मात्र आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि दिल्लीवारीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.