Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

उद्धव ठाकरेंचा मॅग्नेटिक महाराष्ट्रवर बहिष्कार

उद्घाटन कार्यक्रमात डावलल्याने उद्धव ठाकरेंनी मॅग्नेटिक महाराष्ट्रवर बहिष्कार टाकल्यासारखं चित्र आहे. 

उद्धव ठाकरेंचा मॅग्नेटिक महाराष्ट्रवर बहिष्कार

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मॅग्नेटिक महाराष्ट्रचा मुख्य कार्यक्रम आणि नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात डावलल्याने उद्धव ठाकरेंनी मॅग्नेटिक महाराष्ट्रवर बहिष्कार टाकल्यासारखं चित्र आहे. 

पुरस्कार वितरण कार्यक्रमाकडे उद्धव ठाकरेंची पाठ

कारण मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये आज होणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाकडे उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरवली आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये आयोजित महाउद्योग रत्न सन्मान रजनी पुरस्कार सोहळ्याला, मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे, तर उद्धव ठाकरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते.

उद्धव ठाकरेंचा उल्लेख विशेष अतिथी

मात्र नाराज असलेले उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला अनुपस्थित आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात या कार्यक्रमाची जाहिरात छापण्यात आली आहे.

Read More