Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

राणे आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने

नितेश राणेंच ट्विट चर्चेत

राणे आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने

मुंबई : २५ जूनला होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने नारायण राणे कुटुंबीय आणि शिवसेना पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकण्याची चिन्हं आहेत. काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. नार्वेकर यांच्या पत्नी मीरा यांचे मतदार यादीत सहा वेळा नाव नोंदवल्याची बाब नितेश यांनी निदर्शनास आणली आहे.

या पद्धतीने शिवसेनेला निवडणूक जिंकायचीय का असा सवाल राणे यांनी उपस्थित केलाय. राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने राजू बंडगर या उमेदवाराला या निवडणुकीत पाठिंबा जाहीर केला आहे.

Read More