Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर घटला

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली प्रवाशांची टक्केवारी निच्चांकी पातळीवर

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर घटला

मुंबई : एकीकडे पेट्रोल डिझेलचे दर अक्षरशः कंबरडं मोडत आहेत. मात्र दुसरीकडे राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची टक्केवारी चिंताजनकरित्या घसरत आहे. बससेवा, रेल्वेसेवा यांच्याऐवजी खासगी वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा परिणाम म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली प्रवाशांची टक्केवारी निच्चांकी पातळीवर पोहोचली आहे.

ढिसाळ कारभार जबाबदार 

 २०१८ या वर्षात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करणाऱ्यांची टक्केवारी अवघी २५ ते ३५ टक्क्यांवर आलीय. मात्र याला या व्यवस्थांचा अत्यंत ढिसाळ कारभार जबाबदार आहे. गेल्या ४ वर्षात मुंबईत बेस्टच्या बसेसची संख्या गेल्या ४ वर्षात अजिबात वाढलेली नाही. मात्र दुचाकींची संख्या १३.९ कोटींवरून १८.६ कोटींवर गेलीय. चारचाकींची संख्या २.६ कोटींवरून ३.३ कोटींवर पोहोचलीय. 

Read More