Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

वसई-विरामधला वीजपुरवठा पूर्ववत

वसई विरार परिसरातला वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आलाय. 

वसई-विरामधला वीजपुरवठा पूर्ववत

वसई : वसई विरार परिसरातला वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आलाय. महावितरण आणि महापारेषणच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. मात्र पाणी साचलेल्या ठिकाणी अजूनही वीज आलेली नाही. सबस्टेशनमध्ये ४ फूट पाणी साचलं होतं. त्यामुळे बिघडलेली यंत्रणा १०० कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नाने सुरू केली.

रेल्वे वाहतूकही सुरू

तब्बल २४ तासांच्या खोळंब्यानंतर चर्चगेट ते डहाणू रोड लोकल हळूहळू पूर्वपदावर येत आहे. चर्चगेट ते भाईंदर लोकलसेवा सुरळीत सुरू झालीय. तर भाईंदर ते विरार लोकल वाहतूक संथ गतीनं सुरू झालीय. मात्र विरारपासून डहाणूपर्यंतची वाहतूकही सुरळीत झालीय.

सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी चर्चगेटहून वसई रोड स्थानकात आलेली गाडी विरारच्या दिशेनं सोडण्यात आली. सकाळच्या सत्रात विरारहून चर्चगेटच्या दिशेनं पाच लोकल गाड्या रवाना झाल्या होत्या. या गाड्या विरार ते नालासोपारा प्रवासात  ताशी १० किमी वेगानं धावल्या. त्यामुळे आता तीन ट्रॅकवरची वाहतूक सुरू झालीय.

Read More