Vasai Virar : महानगरपालिकेने वसई विरार शहर झोपडपट्टी मुक्त करण्याचे ठरवले आहे. यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य अधिकारी यांच्या माध्यमातून पालिकेत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. वसई विरार शहरात दोन लाखाहून अधिक झोपडपट्या बांधण्यात आलेल्या आहेत. यांचे सर्वेक्षण करून लगेच कामाला सुरुवात होणार आहे. येत्या पाच वर्षात सर्व झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. यामुळे शहराचा कायापालट होणार आहे.
पालिका मुख्यालयात SRA अधिकाऱ्यांची बैठक
ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहेत तेथील लोकांनी एकत्रित येऊन सोसायटी स्थापन करावी आणि सोसायटीचा ठराव घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन असा ठराव घ्यावा त्यामध्ये एक आर्किटेक आणि डेव्हलपर्सची नेमणूक करावी अश्या सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत. या बैठकीत पालिका आयुक्त अनिलकुमार पवार व आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित व आमदार विलास तरे उपस्थित होते.
वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र 'झोपडपट्टी मुक्त' करण्यासाठी झोपु प्राधिकरणामार्फत योजनाना लवकरात लवकर मान्यता देऊन या योजना मार्गी लावून झोपडपट्टीधारकांना त्यांच्या हक्काचे घर देण्यात येईल असं आश्वासन एसआरए ठाण्याचे मु्ख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी दिले आहेत. त्यासोबत झोपु प्राधिकरणामार्फत वसई-विरार महानगर पालिका क्षेत्रातील विकासक व वास्तुविशारद यांना देखील या योजनेत सामील होण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
पाच वर्षात शहराचा होणार कायापालट
त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. या योजनचे उद्दिष्ट व संपूर्ण माहिती ही झोपडपट्टीधारकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. जर या झोपडपट्टीधारकांचा सकारात्मक सहभाग वाढविण्याकरिता व ही योजनेची माहिती पोहोचवल्यास ही योजना यशस्वी होण्यास मदत होईल. त्यामुळे वसई-विरार परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजना महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण वसई-विरार महानगरपालिकेच्या माध्यामातून माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे येत्या पाच वर्षात या शहराचा कायापालट होणार आहे.