Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

वसंतोत्सवाला सुरुवात... रंगोत्सवात तरुणाई रंगली!

आज धुलिवंदन... होळीच्या दुसऱ्या दिवशी अवघा देश आज रंगोत्सवात न्हाऊन निघणार आहे.

वसंतोत्सवाला सुरुवात... रंगोत्सवात तरुणाई रंगली!

मुंबई : आज धुलिवंदन... होळीच्या दुसऱ्या दिवशी अवघा देश आज रंगोत्सवात न्हाऊन निघणार आहे.

आजच्याच दिवसापासून वसंतोत्सवास प्रारंभ होतो. त्यामुळे वातावरणाताला आल्हाददायकपणाला रंगोत्सवाची एक वेगळीच झळाळी मिळते.

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आजच्या या रंगोत्सवाचीच वेगवेगळी रुप पहायला मिळतात. कृत्रिम आणि रासायनिक रंगाच्या समाज प्रबोधनानंतर यंदा नैसर्गिक रंगाचा वापर करण्यावर भर देण्यात येतोय.

त्याचप्रमाणे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी यंदाही सोसायटी आणि तरुणाईनेही पुढाकार घेतलाय. देशातल्या या रंगोत्सवाचे वेगवेगळे रंग आज अवघ्या देशभर पहायला मिळणार आहेत.

Read More