Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

गाडी फोडण्याचे लोण पसरले मुंबई शहरातही...

  राज्यासह मुंबईच्या उपनगरात अज्ञात व्यक्तींकडून वाहनाची तोडफोड किंवा जाळपोळच्या घटना नेहमी घडत असतात. आता हे लोण मुंबई शहरातही पसरले आहे. 

गाडी फोडण्याचे लोण पसरले मुंबई शहरातही...

दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई :  राज्यासह मुंबईच्या उपनगरात अज्ञात व्यक्तींकडून वाहनाची तोडफोड किंवा जाळपोळच्या घटना नेहमी घडत असतात. आता हे लोण मुंबई शहरातही पसरले आहे. 

प्रभादेवी येथील हिमगिरी अपार्टमेंटमधील रहिवाशांना अलीकडे एका वेगळ्याच प्रसंगाला तोंड द्यावं लागतंय. अज्ञात व्यक्तींकडून त्यांच्या गाड्यांना लक्ष्य केलं जातंय.

 गेल्या 7 दिवसात इथे 3 गाड्या फोडून समाजकंटकांनी  रहिवाशांचं मोठं आर्थिक नुकसान केलंय. पहाटे रहिवाशी गाढ झोपेत असताना हा हल्ला करण्यात येतो. 
 
 हे समाजकंटक नेमके कोण आहेत आणि ते गाड्यांचे नुकसान का करीत आहेत याचा दादर पोलीस तपास करीत आहेत. या संदर्भात हिमगिरी अपार्टमेंटचे चेअरमन सुरेश जोशी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

Read More