Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

व्हिडिओ : मगरींचा ते भयंकर दृश्यं सावित्री नदीतलं?

अंगाचा थरकाप उडवणारं हे दृश्य महाडच्या सावित्री नदीतील असल्याचं सोशल मीडियावर पोस्ट होतंय

व्हिडिओ : मगरींचा ते भयंकर दृश्यं सावित्री नदीतलं?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नदीपात्रातल्या मगरींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. एका संथ नदीपात्रावरुन हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं हे दृश्यं घेतलंय. यात सुरुवातीला एक मगर दिसते... त्यानंतर क्षणात शेवाळानं भरलेल्या नदीपात्रात तुफान हालचाल होते मगरींचा भलामोठा झुंडच दिसू लागतो... अंगाचा थरकाप उडवणारं हे दृश्य महाडच्या सावित्री नदीतील असल्याचं सोशल मीडियावर पोस्ट होतंय... 

मात्र, हे दृश्य सावित्री नदीतील नाही... काहींच्या म्हणण्यानुसार हे दृश्य मगरींसाठी प्रसिद्ध असलेल्या गुजरातमधील विश्वामित्री नदी पात्रातील असल्याचं सांगण्यात येतंय... मात्र, याला अद्याप कुणालाही दुजोरा मिळालेला नाही.

Read More