Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Viral News : 'तुमचं हृदय कोणत्याही क्षणी बंद होणार'; डॉक्टराने भयानक रिपोर्ट दिल्यानंतर गाठली मुंबई अन् मग...

Viral News : छातीत दुखतो म्हणून तो डॉक्टरकडे गेला, तपासणी केल्यावर डॉक्टर म्हणाले की, तुमचं हृदय कोणत्याही क्षणी बंद होणार, हे ऐकताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने मुंबई गाठली आणि डॉक्टरकडे गेल्या असता नवीन रिपोर्टने त्याला धक्काच बसला.     

Viral News : 'तुमचं हृदय कोणत्याही क्षणी बंद होणार'; डॉक्टराने भयानक रिपोर्ट दिल्यानंतर गाठली मुंबई अन् मग...

Viral News : डॉक्टर आणि वकील यांच्यापासून काही लपवून ठेवायचं नसतं. डॉक्टर हे आपल्यासाठी देव माणूसासारखे असतात. मोठ्या आजारातून ते रुग्णांना बाहेर काढतात. भोपाळमधील एका व्यावसायिकाला छातीत दुखतं होतं. म्हणून तो भोपाळमधील खाजगी रुग्णालयात गेला. तिथे त्याच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर डॉक्टराने त्याला सांगितलं तुझे हृदय कधीही बंद पडू शकतं. हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. या व्यावसायिकाला हा रिपोर्ट भोपाळमधील सागर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये देण्यात आला होता. या हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितलं की, त्यांच्या हृदयाच्या 100% धमन्यांमध्ये ब्लॉकेज असून त्यांना कधीही कार्डियक अरेस्ट होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. या रिपोर्टनंतर त्या व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ आलं. 

या व्यापाऱ्यांचं नाव अजय दुबे असं होतं. या रिपोर्टनंतर अजय यांनी कुटुंबाला भोपाळला बोलवं. कुटुंबांतील सदस्यांनी त्यांना मुंबईत शस्त्रक्रिया करु असं सांगितलं. त्यामुळे त्यांनी मुंबईतील सुराणा हॉस्पिटल गाठलं आणि त्यानंतर त्यांची पुन्हा एकदा संपूर्ण तपासणी करण्यात आली. पण यंदा या तपासणीत जे धक्कादायक सत्य आहे, त्यानंतर अजयसोबत दुबे कुटुंबात नवीन वादळ आलं. (Viral News doctor said businessman diagnosed heart blockage surgery truth came out after going to Mumbai before the surgery)

नेमकं काय आलं रिपोर्टमध्ये?

अजय दुबे यांची 14 एप्रिलला पारंपरिक इनोवेटिव्ह एंजियोग्राफी मुंबईतील कार्डिएक तज्ज्ञ डॉ. रमेश कावर यांनी केली. त्या रिपोर्टनंतर असं समोर आलं की, अजय यांच्या फक्त एकाच धमन्यात 40% ब्लॉकेज आढळले. हा रिपोर्ट पाहून डॉक्टर म्हणाले की, वयाच्या 60 व्या वर्षी ही बाब अतिशय सामान्य असते. यासाठी कुठल्याही शस्त्रक्रियेची आवश्यकता नसते. हे ऐकल्यावर अजय आणि दुबे कुटुंबातील सदस्यांच्या तळमस्तकातील आग डोक्यात गेली. 

हॉस्पिटलवर कारवाई

यानंतर दुबे कुटुंबियांतील भोपाळमधील रुग्णालयावर एक कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी कायदेशीर नोटीस पाठवलीय. या नोटीसला 15 दिवसांत उत्तर न दिल्यास कोर्टात जाण्याचा इशारा दुबे कुटुंबियांनी दिला आहे. हॉस्पिटलने दिलेल्या चुकीच्या रिपोर्टमुळे रुग्णाला मानसिक त्रास, व्यावसायिक नुकसान आणि चुकीच्या निदानामुळे परदेश दौरा रद्द करावा लागल्यात अजय दुबे यांनी या नोटीसमध्ये सांगितलं आहे. 

हॉस्पिटलकडून स्पष्टीकरण!

या प्रकरणावर सागर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. आदित्य अग्रवाल म्हणाले की, आत्तापर्यंत आम्हाला कोणतीही नोटीस मिळालेली नसून नोटीस मिळाल्यावरच दावा काय आहे ते आम्ही पाहू. आमच्याकडे वापरण्यात येणाऱ्या तपासणीच्या सर्व यंत्रणा अत्याधुनिक असून अशा प्रकारच्या चुका होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

Read More