Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

VIDEO: भरदिवसा चिमुकलीचं अपहरण, सहा तासांत चिमुकलीची सुटका

देशातील महत्वाच्या शहरांमध्ये लहान मुलांचं अपहरण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आता मुंबईतही असाच एक प्रकार घडला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

VIDEO: भरदिवसा चिमुकलीचं अपहरण, सहा तासांत चिमुकलीची सुटका

मुंबई : देशातील महत्वाच्या शहरांमध्ये लहान मुलांचं अपहरण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आता मुंबईतही असाच एक प्रकार घडला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

एका चिमुकलीचं दुकानाबाहेरुन अपहरण केल्याची खळबळजनक घटना मुंबईत घडली आहे. भर बाजारात हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ न्यूज एजन्सी एएनआयने प्रसिद्ध केला आहे.

व्हिडिओत दिसत आहे की, एक व्यक्ती चालत येतो आणि दुकानासमोर उभ्या असलेल्या चिमुकलीला उचलुन नेतो. मुंबईतील साकीनाका परिसरात ही घटना घडली आहे. 

सीसीटीव्हीत घटना कैद 

ही संपूर्ण घटना दुकानाबाहेरील कॅमेऱ्यात कैद झाली. २.५ वर्षांची चिमुकली अचानक दिसेना झाल्याने तिच्या आई-वडिलांनी शोधाशोध सुरु करण्यास सुरुवात केली. मात्र, मुलगी कुठेच दिसत नव्हती.

६ तासांत मुलीची सुटका, आरोपी अटकेत

मुलीचा शोध घेतल्यानंतरही कुठेच भेटली नाही. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनीही तात्काळ शोध सुरु केला. दुकानाबाहेर लावण्यात आलेलं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी ६ तासांतच चिमुकलीची सुखरुप सुटका केली आणि आरोपीला अटक केली.

Read More