Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबई महापालिकेत पाणी मीटर खरेदीत मोठा गैरव्यवहार

मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात २५७ कोटी रुपयांच्या वॉटर मीटर खरेदी प्रकरणात मोठा गैरव्यवहार.

मुंबई महापालिकेत पाणी मीटर खरेदीत मोठा गैरव्यवहार

मुंबई : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात २५७ कोटी रुपयांच्या वॉटर मीटर खरेदी प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण झी २४ तासने समोर आणल्यानंतर पालिका सभागृहातही हा मुद्दा गाजला. शिवसेनेचे नगरसेवक किरण लांडगे यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे हे प्रकरण सभागृहात मांडत याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केलीय. तसंच या एएमआर मीटर खरेदी प्रकरणातील दोषी अधिका-यांवरही त्यांनी कारवाईची मागणी केली.

 राज्य विधिमंडळाच्या लोकलेखा समितीनं एएमआर मीटर खरेदी प्रकरणात अनियमितता झाल्याचे कडक ताशेरे ओढल्यानंतरही पालिका प्रशासन मात्र अजूनही गंभीर झालेले नाही. १३ दोषी अधिका-यांपैकी ७ अधिकारी सेवानिवृत्त झालेत तरी पालिका प्रशासन या गैरव्यवहाराबाबत बघ्याची भूमिका घेतंय. 

महसूल वाढवण्याच्या हेतूनं एएमआर बसवण्याचा निर्णय २००९ मध्ये घेतला गेला होता. परंतु संबंधिक कंत्राटदार आणि प्रशासनाच्या गलथान कारभारामुळं ही योजना अपयशी ठरली. अजूनही ४० कोटी किंमतीचे २७ हजार एएमआर धूळखात पडून आहेत, तर कंत्राटदारांकडून १२७ कोटी रुपयांचा दंडही वसूल केला गेलेला नाही.

Read More