Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

पश्चिम रेल्वेवर सलग तीन दिवस 300 लोकल रद्द होणार, आजच Train चे वेळापत्रक पाहून घ्या

Western Railway Mega Block: पश्चिम रेल्वेवर या आठवड्यात प्रशासनाकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कसं असेल लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या.   

पश्चिम रेल्वेवर सलग तीन दिवस 300 लोकल रद्द होणार, आजच Train चे वेळापत्रक पाहून घ्या

Western Railway Announced Major Mega Block: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वेवर तीन दिवस मेगाब्लॉक आयोजित करण्यात येत आहे. 24, 25 आणि 26 जानेवारीच्या रात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान 330 पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. 

पश्चिम रेल्वे मार्गावर माहिम आणि वांद्रे स्थानकादरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पश्चिम रेल्वे मेगाब्लॉक घेत आहेत. या ब्लॉकमुळं शुक्रवार-शनिवार रात्री 127 उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील. शनिवारी/रविवारी रात्री सुमाराच्या 150 उपनगरीय लोकल सेवा रद्द केल्या जातील. तसंच, 60 उपनगरीय सेवा अंशत: रद्द केल्या जाणार आहेत. 

24 जानेवारी रोजी रात्री 11 ते शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत माहिम आणि वांद्रे स्थानकांत धीम्या मार्गावर ब्लॉकचे आयोजन करण्यात येत आहे. याकाळात डाउन फास्ट मार्गावरदेखील रात्री 12.30 ते सकाळी 6.30 पर्यंत ब्लॉक राहील. तसंच, 25 आणि 26 जानेवारीला रात्री 11 ते रविवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत अप आणि डाउन स्लो आणि डाउन फास्ट मार्गावर ब्लॉक असेल. 

तसंच, जलद मार्गावर शनिवारी रात्री 11 वाजता ब्लॉक सुरू होऊन रविवारी सकाळी 7.30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. 24 जानेवारीला शेवटची चर्चगेट-विरार स्लो लोकल रात्री 11.58 वाजता सुटेल. रात्री 11 वाजता ब्लॉक सुरू होऊन रविवारी सकाळी 7.30 वाजेपर्यंत ब्लॉक राहील. 24 जानेवारीला शेवटची चर्चगेट-विरार स्लो लोकल रात्री 11.58 वाजता सुटेल. रात्री 11 वाजेपासून चर्चगेटवरून सुटणाऱ्या सर्व स्लो लोकल मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझ दरम्यान जलद मार्गावर धावतील. यावेळी महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकांवर लोकल थांबणार नाही.

24 जानेवारीला रात्री 11 वाजेनंतर विरार, भाईंदर आणि बोरिवलीहून सुटणाऱ्या स्लो गाड्या सांताक्रूझ आणि मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर धावतील. याव्यतिरिक्त, काही लोकल हार्बर मार्गावर गोरेगाव आणि वांद्रे दरम्यान धावतील. 25 जानेवारी (शनिवारी) सकाळी विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर आणि बोरिवली येथून येणाऱ्या स्लो आणि फास्ट लोकल अंधेरी येथे थांबतील. ब्लॉकनंतर चर्चगेटकडे जाणारी पहिली फास्ट लोकल शनिवारी सकाळी 5.47 वाजता विरारहून सुटेल आणि चर्चगेटला सकाळी 7.05 वाजता पोहोचेल. चर्चगेटवरून पहिली डाउन फास्ट लोकल सकाळी 6.14 वाजता सुटेल आणि चर्चगेटवरून पहिली डाउन स्लो लोकल ब्लॉकनंतर सकाळी 8.03 वाजता सुटेल. याशिवाय, या ब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होईल.

Read More