Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

लोकलमधील गर्दी नियंत्रणात येणार? पश्चिम रेल्वेवर राबवणार नवीन प्रयोग, 'या' 3 स्थानकांवर मेट्रोप्रमाणेच...

Mumbai Local Train Updte: लोकलमध्ये प्रवास करताना आता मेट्रोसारख्या नियंत्रित स्थानकांवर राबवण्यात येणार आहे. बोरिवली, अंधेरी या स्थानकांचा समावेश आहे.  

लोकलमधील गर्दी नियंत्रणात येणार? पश्चिम रेल्वेवर राबवणार नवीन प्रयोग, 'या' 3 स्थानकांवर मेट्रोप्रमाणेच...

Mumbai Local Train Updte: लोकलमधील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून एक नियम राबवण्यात येणार आहे. रेल्वेकडून पश्चिम रेल्वेच्या 12 स्थानकांवर या प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यासाठी संबंधित स्थानकांची यादी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आली आहे. या यादीतील मुंबईतील वांद्रे टर्मिनस, बोरिवली आणि अंधेरी या मुंबईतील तीन स्थानकांचा समावेश आहे.

या प्रकल्पांतर्गंत मेट्रोप्रमाणेच लोकल रेल्वे स्थानकावरदेखील नियंत्रित प्रवेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अंधेरी, बोरीवली आणि वांद्रे टर्मिनसस या स्थानकांवर येत्या काळात प्रवाशांच्या नियंत्रित प्रवेशासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येईल. सध्या तरीही पायलट प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पात यश मिळाले तर मुंबईतील अन्य स्थानकांवर ही उपाययोजना राबवण्यात येणार आहे. 

12 प्रवेशाची अंमलबजावणी करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. पश्विम रेल्वेच्या 12 स्थानकांवर हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून यासाठी संबंधित स्थानकांची यादी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आली आहे. या यादीत वांद्रे टर्मिनस, बोरिवली, अंधेरीसह गुजरात विभागातील 1 स्थानकांचा समावेश आहे, अशी माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

150 वर्षांहून अधिक जुनी वाहतूक प्रणाली असलेल्या लोकलमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन या प्रणालीत काळानुसार सुधारणा करणे आवश्यक झाले आहे. एसी लोकलच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आता स्थानकांवर मेट्रोसारखी व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने देशभरातील विविध रेल्वे विभागांकडून संभाव्य स्थानकांची यादी मागवली होती. या प्रकल्पांतर्गत प्रवाशांना मेट्रोप्रमाणे तिकीट तपासणी, सुरक्षा तपासणी आणि फलाटांवर प्रवेश साठी ठराविक मार्गाने जावे लागणार आहे. 

काय होतील फायदे?

- नियंत्रित प्रवेशामुळे प्लॅटफॉर्मवर होणारी अनावश्यक गर्दी कमी होईल. 
- बिनतिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवता येईल.
- नव्या डेकवर तिकीट खरेदी, तपासणी आणि प्रवेशाची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.
- तिकीट तपासणी आणि सुरक्षा तपासणी अधिक काटेकोरपणे करता येईल, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित होईल.

Read More