Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने, गोरेगाव स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड

गोरेगाव रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.

पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने, गोरेगाव स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड

मुंबई : गोरेगाव रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. सकाळ सकाळ कामाला जाण्याच्या वेळेतच हा बिघाड झाल्याने प्रवाशांची धावपळ झाली आहे. यामुळे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला.

आता वाहतूक हळूहळू पुर्वपदावर येत आहे. गाड्या जरी सुरु झाल्या असल्या तरी प्लॅटफॉर्मवर गर्दी आहे. तसेच काही गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. 

Read More