Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

धारावी झोपडपट्टीच्या जागी आधी काय होतं? असं काय झालं की इतकी लोकं इथे राहायला लागली?

History of Dharavi: धारावीमधील झोपडपट्टी संपूर्ण आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते. पण तुम्हाला या धारावीचा इतिहास माहिती आहे का?  

धारावी झोपडपट्टीच्या जागी आधी काय होतं? असं काय झालं की इतकी लोकं इथे राहायला लागली?

History of Dharavi: जेव्हा कधी मुंबईचं नाव घेतला जातं तेव्हा आर्थिक राजधानी, स्वप्नांचं शहर, स्वप्नांची नगरी, बॉलिवूड अशा अनेक गोष्टींचा उल्लेख होते. याशिवाय मुंबईची आणखी एक ओळख म्हणजे येथे असणाऱ्या चाळी. या मुंबईच्या इतिहासाचा आणि अस्मितेचा भाग आहेत. दरम्यान आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टीही मुंबईत आहे. येथे लाखो लोकांची वस्ती आहे. येथे अनेक लघु उद्योग, व्यवसायही चालतात ज्यांचा मुंबईच्या अर्थव्यवस्थेत वाटा आहे. 

तुम्हीही धारावीबद्दल खूप काही ऐकलं असेल, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की धारावीमध्ये एवढ्या छोट्या जागेत इतके लोक कसे काय राहतात. धारावीचा नेमका इतिहास काय आहे आणि येथे मोठ्या संख्येने लोक कसे स्थायिक होऊ लागले? याबद्दल जाणून घ्या. असं  म्हणतात की आज धारावी जिथे आहे तिथे एकेकाळी एक बेट होतं. 

आधी धारावीच्या जागी काय होतं...

वास्तविक, धारावी हे खारफुटीचे बेट होते. पण, हळूहळू कोळी मच्छीमारांनी येथे वास्तव्यास सुरुवात केली. त्यावेळी येथे राहणाऱ्यांची संख्या खूपच कमी होती, पण हळूहळू लोकसंख्या वाढू लागली आणि त्याचे झोपडपट्टीत रूपांतर झाले. या झोपडपट्ट्या ब्रिटीश वसाहतीच्या काळात बांधल्या गेल्या आणि जेव्हा गरीब लोक स्थलांतर करू लागले तेव्हा इथली संख्या सतत वाढत गेली.

त्यावेळी धारावी आणि इतर झोपडपट्ट्यांची लोकसंख्या वाढण्याचे कारण म्हणजे ब्रिटिश सरकारने अनेक गरीब लोकांना शहरातून काढून टाकण्यास सुरुवात केली होती आणि अनेक कारखानेही शहरातून काढून टाकले होते. त्यामुळे कामगारांना शहरात भाड्याने राहणे शक्य नसल्याने त्यांनी मुंबईच्या बाहेरील भागातील झोपडपट्ट्यांमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यातील धारावी हे महत्त्वाचे ठिकाण होते.  स्वातंत्र्यापूर्वीच या एका ठिकाणी लोकसंख्या वाढू लागली. यानंतर येथे स्थलांतरित मजुरांची संख्या वाढल्याने त्यांनी स्वस्त राहण्यासाठी ही जागा निवडली आणि लोकांची संख्या वाढतच गेली. आता परिस्थिती अशी आहे की येथे सुमारे 1 दशलक्ष लोक राहतात आणि क्षेत्रफळ खूपच कमी आहे. यामुळे लोकसंख्येची घनता 869,565 व्यक्ती प्रति चौरस मैल आहे.

ही जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी मानला जाते, ज्याचं क्षेत्रफळ 2.39 चौरस किलोमीटर आहे आणि मोठ्या संख्येने लोक येथे राहतात. तसेच, या ठिकाणी जगातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता आहे, याचा अर्थ असा आहे की येथे लहान जागेत बरेच लोक राहतात.

Read More