Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

जगातील सर्वात मोठी लिफ्ट मुंबईत..! तब्बल 200 लोकांचा भार उचलण्याची क्षमता

मुंबईत जगातील सर्वात मोठी लिफ्ट कार्यान्वयित करण्यात आली. या लिफ्टची निर्मिती कोन इंडिया लिमिटेडने केली आहे..

जगातील सर्वात मोठी लिफ्ट मुंबईत..! तब्बल 200 लोकांचा भार उचलण्याची क्षमता

मुंबई : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसानिमित्त आज मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये जगातील सर्वात मोठी लिफ्ट कार्यान्वयित करण्यात आली आहे. या लिफ्टमध्ये एकाच वेळ तब्बल 200 लोक ये जा करू शकता. कॉम्प्लेक्समधील जिओ कन्वेन्शन सेंटरमध्ये ही लिफ्ट कार्यान्वयित करण्यात आली. लिफ्टला पाच थांबे असून वजन तब्बल 16 टन इतकं आहे.

जगातील सर्वात मोठ्या अशा या लिफ्टची निर्मिती कोन इलेवेटर्स इंडिया कंपनीने केली आहे. ही लिफ्ट 25.78 स्क्वेअर मीटर इतकी मोठी आहे. लिफ्टमध्ये माहिती देणाऱ्या दोन स्क्रीन लावण्यात आल्या असून चार पॅनलचे दार आहे. लिफ्टच्या सजावटीसाठी एलईडी लाईट देखील लावण्यात आले आहे. स्वयंचलित जिन्यांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. 

Read More