Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

तुमची मुलं व्यसनाच्या विळख्यात! इंटरनेटच्या मायाजालात हरवलं बालपण

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानं जाहीर केलेले आकडे धक्कादायक आहेत

तुमची मुलं व्यसनाच्या विळख्यात! इंटरनेटच्या मायाजालात हरवलं बालपण

कविता शर्मा, झी मीडिया, मुंबई : तुमच्या घरात 10 ते 18 वर्षांची मुलं असतील तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या वयोगटातली मुलं नव्या व्यसनामध्ये अडकतायत.

लहान मुलं मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉपला सतत चिकटलेली दिसतात. सध्या प्रत्येक घरोघरी दिसणारं हे दृश्य आहे. कोरोना काळात ऑनलाईन शाळांशिवाय पर्याय नाही. पण शाळा संपली तरीही जेवताना, झोपताना सतत मुलांना मोबाईल हवा आहे. 

याबाबत देशातल्या दिल्ली,हैदराबाद,मुंबई ,भुवनेश्वर, रांची आणि गुवाहाटीमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं. संदर्भात राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानं जाहीर केलेले आकडे चक्रावणारे आहेत. 

fallbacks
 
या शिवाय 52 टक्के मुलं चॅटिंग करतात, 13 वर्षांखालील मुलांना फेसबुक, इन्स्टावर अकाऊण्ट उघडता येत नाही, पण या मुलांनी पालकांच्या मोबाईलवरुन अकाऊण्ट उघडलेत. अशी माहितीही या सर्वेक्षणात पुढे आली आहे. दिवसातील एका तासापेक्षा अधिक वेळ मुले मोबाइलवर गेम खेळण्यात किंवा लॅपटॉपवर खर्च करतात. सहज उपलब्ध असणारे इंटरनेट, मोबाइल, गेम्स या गोष्टींमुळे मुलांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर परिणाम होतो.

मुलं आणि पालकांचा संवाद आणि सहवास कमी झाला आहे. त्यामुळे मुलांना गॅझेटशिवाय पर्याय राहत नाही. सतत मोबाईल पाहात राहाणं, ही व्यसनाची सुरुवात आहे. वेळीच मोबाईलची सवय सुटली नाही,  तर भविष्यात मुलांवर गंभीर परिणाम होतील, त्यामुळे पालकांनो, वेळीच सावध व्हा.

Read More