Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

नालासोपाऱ्यात गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या भक्ताला टँकरने चिरडले

या घटनेनंतर स्थानिक रहिवासी संतप्त झाले आहेत.

नालासोपाऱ्यात गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या भक्ताला टँकरने चिरडले

मुंबई: नालासोपारा परिसरात गुरुवारी गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या एका भक्ताला टँकरने धडक दिली. यामध्ये गणेशभक्ताचा मृत्यू झाला आहे. येथील धणीवबाग परिसरात हा प्रकार घडला. कमलेश बिंदे असे मृत तरुणाचे नाव आहे. कमलेश येथील रस्त्यावरून गणेशमूर्ती घेऊन घरी जात होता. त्यावेळी टँकरने कमलेशला पाठीमागून धडक दिली. यामध्ये कमलेशचा मृत्यू झाला. 

या घटनेनंतर स्थानिक रहिवासी संतप्त झाले आहेत. संतप्त जमावाकडून या परिसरातील वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच नागरिकांनी येथील वाहतुकही रोखून धरली आहे. 

Read More