Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'झी २४ तास' इम्पॅक्ट : 'शिरोडकर'च्या त्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले

शिरोडकर हायस्कूलला 'सीबीएसई'ची मान्यता नसल्याचं समोर आल्यानंतर दहावीच्या तब्बल ८४ विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची झोपच उडाली होती पण... 

'झी २४ तास' इम्पॅक्ट : 'शिरोडकर'च्या त्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले

दीपाली जगताप-पाटील, झी २४ तास, मुंबई : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल काल जाहीर झाला. यात परेल इथल्या सीबीएसई बोर्डाच्या शिरोडकर शाळेच्या विद्यार्थ्यांचा आनंद आज गगनात मावेनासा झालाय. ऐन परीक्षेच्या तोंडावर शिरोडकर शाळेला सीबीएसईची मान्यता नसल्यानं विद्यार्थ्या्ना परीक्षा देता येईल का? यावर २९ जानेवारीला झी २४ तासनं वृत्त प्रसारित केलं. झी २४ तासच्या बातमीनंतर राज्याचा शिक्षण विभाग आणि केंद्राकडून एमएचआरडी विभागाकडून सीबीएसई मान्यतेसाठी वेगानं प्रक्रिया सुरू झाली. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जावू नये म्हणून 'झी २४ तास'नं शिरोडकर शाळेच्या सीबीएसई मान्यतेचा विषय ठामपणे मांडला. आज अखेर पहिल्या बॅचचा निकाल हाती आल्यावर विद्यार्थी, शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. काही विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यांच्या अश्रुतूनच आपली बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांनी आवर्जून 'झी २४ तास'चे आभार मानले. 

शिरोडकर हायस्कूलला 'सीबीएसई'ची मान्यता नसल्याचं समोर आल्यानंतर दहावीच्या तब्बल ८४ विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची झोपच उडाली होती. आपल्या पाल्याचं दहावीचं वर्ष वाया जाणार का? असा प्रश्न त्यांना सतावत होता. त्यांच्या या प्रश्नाचा 'झी २४ तास'नं चांगलाच पाठपुरावा केला. त्यानंतर या प्रकरणाची शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत चर्चाही केली होती. गेल्या दहा वर्षांपासून सीबीएसईच्या नावाखाली प्रवेश देणाऱ्या या शाळेला मान्यता मिळवता आली नाही तर पुढच्या वर्षी ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा इशाराही तावडेंनी दिला होता. 
 

Read More