Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबई - वरळीतील अपार्टमेंटची रेकॉर्डब्रेक विक्री, 7 कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी, मग घराची किंमत काय असेल? अंदाज लावून पाहा

Mumbai Real Estate Update: मुंबईतील वरळीमधील अपार्टमेंटच्या विक्रीने नवा रेकॉर्ड केला आहे. 17 हजार 384 स्क्वेअर फुटांमधील हे अपार्टमेंट ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्टमध्ये आहे.   

मुंबई - वरळीतील अपार्टमेंटची रेकॉर्डब्रेक विक्री, 7 कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी, मग घराची किंमत काय असेल? अंदाज लावून पाहा

Mumbai Real Estate Update: मुंबईतील वरळीमधील अपार्टमेंटच्या विक्रीने नवा रेकॉर्ड केला आहे. झायडस लाइफसायन्सेस लिमिटेडशी (यापूर्वीचं कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड) संबंधित झायडस फॅमिली ट्रस्टने मुंबईतील वरळी येथे 200 कोटींचं आलिशान अपार्टमेंट विकत घेतलं आहे. IndexTap.com ने मिळवलेल्या या मालमत्तेची नोंदणी कागदपत्रं मिळवली असून त्याआधारे हे वृत्त देण्यात आलं आहे. 

17 हजार 384 स्क्वेअर फुटांमधील हे अपार्टमेंट मुंबईस्थित रिअल इस्टेट कंपनी ओबेरॉय रिअॅल्टीचा आलिशान प्रोजेक्ट असलेल्या ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्टच्या 61 व्या मजल्यावर आहे. कागदपत्रांमधून मिळालेल्या माहितीनुसार, हे अपार्टमेंट प्रति चौरस फूट सुमारे 1 लाख 15 हजारांच्या दराने विकलं गेलं आहे.

कागदपत्रांनुसार, या अपार्टमेंटच्या व्यवहारासाठी 7.4 कोटींची स्टॅम्प ड्युटी आणि 30 हजारांची रजिस्ट्रेशन फी भरण्यात आली आहे. या अपार्टमेंटसह 8 कार पार्किंगही खरेदी करण्यात आल्या आहेत. 27 मार्च 2025 रोजी या व्यवहाराची नोंद करण्यात आली आहे. 

कागदपत्रांनुसार, हे अपार्टमेंट झायडस फॅमिली ट्रस्टच्या नावाने खरेदी करण्यात आलं आहे, ज्यामध्ये पंकज पटेल, प्रीती पटेल आणि शर्विल पटेल यांची खरेदीदार म्हणून नोंद आहे. झायडस फॅमिली ट्रस्ट झायडस वेलनेसशी संलग्न आहे आणि पटेल कुटुंबाकडे आहे. या व्यवहारावर त्यांनी अधिकृत काही भाष्य केलेलं नाही. 

ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट प्रोजेक्टबद्दल

ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट हा ओबेरॉय रिअॅल्टीचा एक आलिशान निवासी प्रकल्प आहे. यामध्ये 4 बीएचके आणि 5 बीएचके युनिट्स असलेले दोन टॉवर्स, डुप्लेक्स अपार्टमेंट्स आणि पेंटहाऊस आहेत. या प्रोजेक्टला 2022 मध्ये ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळालं आहे.

ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्टमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि श्रीमंत व्यक्तींचं वास्तव्य आहे. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर, डी'मार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमानी आणि एव्हरेस्ट मसाला ग्रुपचे प्रवर्तक यांचा समावेश आहे.

याशिवाय आरआर काबेलचे प्रवर्तक श्रीगोपाल काबरा आणि त्यांचे कुटुंब, व्यापारी वाडीलाल भाई शाह, डेकोर ब्रँडचे संस्थापक वृतिका गुप्ता आणि एब्को प्रायव्हेट लिमिटेडचे ​​प्रवर्तक अ‍ॅशले नागपाल यांचा समावेश आहे. 

Read More