Mumbai Local Train Time Table From 14 April 2025: महाराष्ट्रासहीत मुंबईतील तापमान मागील काही दिवसांमध्ये वाढल्याचं चित्र दिसत आहे. राज्यात अनेक ठिकाणी पार चाळीशीचा आकडा ओलांडून गेला आहे. राजधानी मुंबईत सुद्धा उन्हाच्या झळा अंगाची लाही लाही करत आहेत. मुंबईत काम करणाऱ्या चाकरमान्यांना तर दुपारी बाहेर पडूनच नये असं वाटतं. त्यातच रोजचा लोकलचा प्रवास म्हणजे अजून डोक्याला ताप असं अनेक मुंबईकरांना वाटतं. मात्र रोजीरोटीसाठी मुंबईची लाईफलाइन असलेल्या लोकल ट्रेनचा प्रवास अनेकांना अनिवार्य असल्यासारखाच आहे. वाढलेलं तापमान आणि लोकलमधील गर्दी याला कंटाळलेल्या लोकल प्रवाशांना मध्य रेल्वेने एक खुश खबर दिली आहे. मध्य रेल्वेने आजपासून म्हणजेच 16 एप्रिलपासून एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेवर 15 एप्रिलपर्यंत सहा एसी लोकल धावत होत्या. त्यापैकी पाच लोकल दिवसभरात 66 फेऱ्या पूर्ण करतात. एक लोकल देखभालीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने उन्हाळ्याची दाहकत आणि प्रवाशांकडून होणारी एसी लोकलची मागणी पाहता ताफ्यात असलेली अंडरस्लंग एसी लोकल वापरात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकलची संख्या सहावरुन सात झाली आहे. परिणामी फेऱ्यांची संख्याही वाढली आहे. आजपासून एसी लोकलच्या फेऱ्यांची संख्या 14 ने वाढणार असल्याने एकूण फेऱ्या 66 वरून 80 होतील. सीएसएमटी ते बदलापूरदरम्यान या एसी गाड्या चालविल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवीन वातानुकूलित सेवा या विद्यमान नॉन - एसी लोकल ट्रेनच्या जागी चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे दररोज एकूण उपनगरीय सेवांची संख्या 1810 इतकी राहणार आहे. या एसी लोकलच्या सेवा सोमवार ते शनिवार चालवल्या जातील. रविवार आणि निर्धारित सुटीच्या दिवशी नॉन - एसी लोकलच्या माध्यमातून संबंधित सेवा सुरू राहणार आहेत.
अप मार्गावर
कल्याण- सीएसएमटी 7.34 सकाळी
बदलापूर-सीएसएमटी 10.42 सकाळी
ठाणे - सीएसएमटी 1.28 दुपारी
ठाणे - सीएसएमटी 3.36 दुपारी
ठाणे-सीएसएमटी 5.41 संध्याकाळी
ठाणे-सीएसएमटी 7:49 संध्याकाळी
बदलापूर-सीएसएमटी 11.04 रात्री
डाऊन मार्गावर
विद्याविहार कल्याण 6.26 सकाळी
सीएसएमटी-बदलापूर 9.09 सकाळी
सीएसएमटी- ठाणे 12.24 दुपारी
सीएसएमटी - ठाणे 2.29 दुपारी
सीएसएमटी-ठाणे 4.38 संध्याकाळी
सीएसएमटी - ठाणे 6.45 संध्याकाळी
सीएसएमटी-बदलापूर 9.08 रात्री