Nashik Crime News : राज्य भरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशातच नाशिमध्ये एक खळबळनज प्रकार घडला आहे. 30 महिलांचा लैंगिक मानसिक छळ करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेतील विभागीय अधिकाऱ्यानेचे या महिलांच्या छळ केला आहे. या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या दोन टर्म पासून नाशिकमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी या महिला आहेत. असे असताना नाशिक जिल्हा परिषदेमध्ये महिला कर्मचारी असुरक्षित असल्याचा समोर आला आहे. जिल्हा परिषदेतील विभागीय अधिकारी हा महिलांचा लैंगिक मानसिक छळ करत असल्याचे तक्रारी विशाखा समितीकडे प्राप्त झाले आहेत एक दोन नव्हे तर चक्क 30 महिलांनी याबाबत तक्रार केली आहे. अधिकारी प्रदीर्घ काळापासून नाशिक जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहे परिणामी त्याच्यावर कुणीही कारवाई करण्यास धजत नाही असे चित्र आहे. पुराव्यासह आता काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर विशाखा समितीकडे याचा तपास देण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात संभाजीनगरच्या विद्यादीप सुधारगृहातून 9 मुलींनी पलायन केलं होतं. बालगृहात छळ होतो, मानसिक कुचंबणा होते निर्दयी वागणूक मिळते असा आरोप करत या मुलींनी स्वतःच्या हातावर काचेनं वार करत पलायन केलं होतं.. पोलिसांनी त्यांना बालगृहात परत सोडलं मात्र त्यांनी केलेले आरोप त्यांच्या छळाची कहाणी सांगण्यासाठी पुरेसे आहेत. मुली बालगृहातून पळून गेल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या हर्षु ठाकूर यांच्या मदतीनं पोलिसांनी त्यांना बालगृहात सोडलं...मात्र त्यानंतर मुलींनी त्यांच्या छळाची गोष्ट ठाकूर यांना सांगितली आणि याला वाचा फोडण्यासाठी ठाकूर यांनी झी 24 तासच्या माध्यमातून जगासमोर मांडली...या मुलींची कहाणी ऐकल्यावर हे बालसुधारगृह आहे की छळछावणी असा प्रश्न निर्माण होतो.
साधं पोट दुखलं तरी प्रेग्नन्सी टेस्ट केली जातेदुखणं कुठलंही असो फक्त एक पांढरी गोळी उपचारासाठी दिली जाते, यातून काही मुलींना इन्फेक्शन झाल्याचा आरोप मुलींनी केला. फार बरं नसेल तर अंगावर पवित्र पाणी शिंपडले जातं आणि पाण्याच्या साहाय्यानं कपाळावर क्रॉस काढलं जातं. ऐकले नाही तर मुलींना जबर मारहाण केली जाते. एका मुलीला तोंडातून रक्त येईपर्यंत मारलं. मुलींची जवळीक वाढली तर त्यांना लेस्बियन म्हणून हिणवलं जातं. झोपण्याच्या रूममध्ये कॅमेरा लावल्यानं कपडेसुद्धा कॅमे-यासमोर बदलावे लागतात असे गंभीर आरोप मुलींनी केले आहेत.