फोर्ब्स इंडियाच्या १५ कॅटेगरीत ३०० नावांची यादी आहे. अंतिम टप्प्यात या ३०० पैकी ३० नावांचा समावेश होईल. या यादीत ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत ३० पेक्षा कमी वय असलेल्या चार खेळाडूंचा समावेश असेल.
२४ वर्षाच्या जयप्रीत बुमराह भारतातील तेज गोलंदाज आहे. त्याने वनडे आणि टी२० शिवाय टेस्ट मॅचमध्येही चांगली कामगिरी केली. त्याने तीन टेस्ट मॅचमध्ये १४, ३३ वनडेत ५८ विकेट्स घेतल्या आहेत.
२८ वर्षांची हरमनप्रीत कौर हीने अलिकडेच झालेल्या महिला वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध १७१ नाबाद अशी खेळी खेळली आणि सर्वत्र चर्चेचा विषय ठरली. बिग बॅश लीगशी करार करणारी हरमनप्रीत ही पहिली भारतीय महिला क्रिकेटर आहे.
२७ वर्षीय भारतीय हॉकी गोलकीपर सविता पूनिया हीला तिच्या आजोबांनी खेळासाठी प्रेरित केले. ती हरियाणाची असून तिच्या कामगिरीवर भारताला गर्व आहे.
२८ वर्षीय हिना सिंधू. ही माजी वर्ल्ड नंबर वन पिस्टल शूटर असून एक उत्तम सर्जन आहे. तिने आवड म्हणून सुरू केलेला खेळ अगदी जिद्दी आणि मेहनतीने पुढे नेला.