जूनमध्ये झालेल्या टी 20 विश्वचषकाध्ये भारताने बाजी मारली. रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्या जोडगोळीचे सर्वत्र कौतुक होत होते. पणा आता लोकांनी त्यांच्यावर टीका करायला सुरूवात केली आहे.
भारतीय संघाला मिळत असलेल्या अपयशानंतर गंभीरच्या अडचणीत वाढ होत आहे कारण त्याने प्रशिक्षकपदी नियुक्ती होण्यापूर्वी बीसीसीआयसमोर काही मागण्या केल्या होत्या. ज्यात स्वतःचा कोचिंग स्टाफ निवडणे आणि संघात आवश्यक बदल करणे या मागण्यांचा समावेश होता. गंभीरच्या सांगण्यावरूनच अभिषेक नायर आणि रायन टेन देसचेट या दोन सहाय्यक प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर झहीर खानला प्राधान्य देत मॉर्नी मॉर्केलला गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले.
गंभीरच्या प्रशिक्षणात भारताने एकूण 11 सामन्यांपैकी टीम इंडियाने पाच जिंकले आणि पाच गमावले. तर एक सामना बरोबरीत आहे. 27 वर्षांनंतर भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या वनडेत पराभवाला सामोरे जावे लागले.
टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामन्यांत ऑलआऊट झाली आणि तीन सामन्यांच्या मालिकेत पहिल्यांदाच 30 विकेट्स गमावल्या. या मालिकेत श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी भारताच्या 30 पैकी 27 विकेट घेतल्या. एकदिवसीय मालिकेत फिरकी गोलंदाजीविरुद्ध सर्वाधिक विकेट्स गमावणारा भारत पहिला संघ ठरला.
या वर्षात भारताला एकही वनडे जिंकता आलेली नाही. ४५ वर्षांनंतरची ही पहिलीच वेळ आहे. शेवटची वेळ भारतीय संघ १९७९ मध्ये एकदिवसीय सामना जिंकू शकला नव्हता.
भारताने 36 वर्षांनंतर न्यूझीलंडकडून कसोटी सामना गमावला. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. बंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाला आठ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. यापूर्वी 1988 मध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता.
बंगळुरूचे चिन्नास्वामी स्टेडियम भारतीय क्रिकेट संघासाठी अभेद्य किल्ला बनले होते. पण न्यूझीलंडने तब्बल 19 वर्षांनंतर भारताला पराभव केला. याआधी भारतीय संघाने 2005 मध्ये कसोटी गमावली होती. त्यानंतर भारताला पाकिस्तानकडून पराभवाला सामोरे जावे लागले.
टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या 46 धावांवर गडगडला. यासह भारतीय संघ घरच्या मैदानावर ५० पेक्षा कमी धावसंख्येवर बाद झाला.
भारताने १२ वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली. तसेच घरच्या मैदानावर विक्रमी 18 कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने 2012 मध्ये घरच्या मैदानावर शेवटची कसोटी मालिका गमावली होती. त्यानंतर टीम इंडियाने सलग १८ कसोटी मालिका जिंकल्या होत्या.
न्यूझीलंडने भारतात कसोटी मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. 24 वर्षांनंतर भारताला दोन किंवा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत घरच्या मैदानावर कोणत्या संघाने क्लीन स्वीप केले आहे. यापूर्वी 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केले होते.
घरच्या मैदानावर तीन किंवा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा हा पहिला क्लीन स्वीप होता. भारत 1933 पासून कसोटी खेळत आहे आणि 91 वर्षात प्रथमच भारताला घरच्या मैदानावर क्लीन स्वीप मिळाला.
तीन किंवा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला क्लीन स्वीप करणारा न्यूझीलंड हा चौथा संघ आहे. याआधी इंग्लंडने भारताला 4 वेळा, ऑस्ट्रेलियाने 3 वेळा आणि वेस्ट इंडिजने एकदा क्लीन स्वीप केले आहे.