एका रोमांचक सिनेमॅटिक प्रवासासाठी सज्ज व्हा. जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी तयार केलेल्या अलीकडील आणि आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या 11 सीरिजची यादी पाहाच...
यवोन स्ट्राहोवस्की, स्कॉट स्पीडमन, रोब मॉर्गन आणि इतर अनेक कलाकारांच्या प्रमुख भूमिकांसह "टीकप" ही थरारक हॉरर सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. बालपणाची भीती आणि गडद गुपितांच्या अस्वस्थ जगातात या सीरिजचं कथानक प्रेक्षकांना फेरफटका मारून आणतो. नकारात्मक शक्ती, प्राचीन काळाती टी कप या आणि अशा अनपेक्षित गोष्टी आणि त्याभोवती फिरणारं रहस्यमयी कथानक यानिमित्तानं पाहायला मिळतं. ही सीरिज जीओ सिनेमावर तुम्ही पाहू शकता.
'द लास्ट नाईट अॅट ट्रेमोर बीच' ही एक आर्कषक स्पॅनिश सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिज आहे. जी प्रेक्षकांना गूढ आणि रंजक कथानकामध्ये खिळवून ठेवते. एका निर्जन किनाऱ्यावरिल शहरामध्ये हा एक आकर्षक स्पॅनिश मनोवैज्ञानिक नेमके कसे अनपेक्षित प्रसंग अनुभवतो हे या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होणारी ही सीरिज Netflix वर पाहता येईल.
हा चित्रपट सिरियल किलर रॉडनी आल्कालाच्या जीवनावर आधारित आहे, 1978 मध्ये "द डेटिंग गेम" मध्ये सहभागी होऊन भयानक कृत्ये करणाऱ्या या पात्राभोवती चित्रपटाचं कथानक फिरतं. चित्रपटात गेम शोच्या घटनांचा मागोवा घेत कथानक पुढे जातं. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
"द पेंग्विन" हा एक थरारक शो आहे, जो DC युनिव्हर्समधील सर्वात भयंकर खलनायकांपैकी एक आणि बॅटमॅनचा मुख्य शत्रू असलेल्या ओस्वाल्ड कोबलपॉट, ज्याला "द पेंग्विन" म्हणूनही ओळखले जाते, याला केंद्रस्थानी ठेवून साकारण्यात आला आहे. कोलिन फॅरेलनेनं इथं मध्यवर्ती भूमिका साकारला आहे. सीरिजचं कथानक एका धनाढ्य कुटुंबातील खिल्ली उडवल्या गेलेल्या मुलापासून पुढं गुन्हेगारी जगताशी त्याचा येणारा संदर्भ याभोवती फिरतं. ही सीरिज तुम्ही Jio Cinemas वर पाहू शकता.
मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर "Squid Game Season 2" प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये काही नवे चेहरे यंदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून, 26 डिसेंबर रोजी ती प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रेक्षक पाहू शकतील. व
"La Máquina" ही एक थरारपटवजा सीरिज आहे. या सीरिजमध्ये एका काळातील आशादायी अॅथलीटची कथा साकारण्यात आली आहे. जो जीवनातील एका अशा वळणावर आहे जिथं तो स्वत:च्याच भूतकाळातील आव्हानांशी संघर्ष करत आपले स्वप्न पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करतोय. डिस्नी प्लस हॉटस्टारवर तुम्ही ही सीरिज पाहू शकता
पहिल्या पर्वाच्या यशानंतर "Hellbound 2" ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. थरारक दैवी न्याय आणि नैतिक अस्पष्टतेचा अभ्यास या सीरिजच्या माध्यमातून पाहता येतो. प्रेक्षकांना 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होणारी ही सीरिज नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
"मॅड मॅक्स: फ्यूरियोसा" एक कमाल प्रीक्वेल असून, तो या आयकॉनिक फ्रँचायझीच्या गोंधळलेल्या जगात प्रवेश करतो. या चित्रपटात क्रिस हेमस्वर्थ, अन्या टेलर-जॉय, निकोलस हॉल्ट, नेथन जोन्स आणि इतर अनेक कलाकार आहेत. हा चित्रपट निर्मनुष्य वाळवंटी भागात आणि तिथं घडणाऱ्या कथानकावर आधारित असून, एका कमाल कलाकृतीला सादर करतो. जिओ सिनेमाज् वर प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकतात.
“ड्यून: प्रॉफेसी” ही HBO ची सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये दोन हर्कोनन बहिणींचा प्रवास आहे, ज्या मानवतेच्या भवितव्याला धोका देणार्या शक्तींना सामोरे जातात आणि त्याग केलेल्या संप्रदायाची स्थापना करण्याचा प्रयत्न करतात. जिओ सिनेमाज् वरही ही सीरिज पाहता येईल.
''सिटाडेल: डायना” ही जागतिक गुप्तचर फ्रँचायझीमधून आलेली एक अॅक्शन-पॅक्ड स्पिनऑफ आहे, जी गुप्तहेर आणि फसवणुकीच्या गुंतागुंतीच्या जगाचा अभ्यास करते. ही सीरिज डायनाच्या प्रवासाचा मागोवा घेते, जी एक कुशल ऑपरेटर आहे आणि आंतरराष्ट्रीय षड्यंत्रांच्या धोकादायक वातावरणात भटकते, आपल्या भूतकाळाशी झगडते. ही सीरिज अॅमेझॉन प्राइमवर पाहता येऊ शकते.
टायलर पेरीची "ब्युटी इन ब्लॅक" ही एक आकर्षक सीरिज असून, महिलांच्या जीवनाच्या भिन्न मार्गांवर उजेड टाकते. सीरिजमध्ये किम्मी, जिचे पात्र टेलर पोलिडोर विल्यम्सने साकारले आहे, तिच्या आईने तिला घराबाहेर काढल्यानंतर आर्थिक ताणाशी झगडते. ही सीरिज नेटफ्लिक्सवर पाहता येईल.