PHOTOS

छोट्याशा रोलसाठी डायरेक्टरची मोठी डिमांड, '12वी फेल'च्या मेधा शंकरचा कास्टिंगबद्दल धक्कादायक खुलासा

Medha Shankar: 12 वी फेल सिनेमामुळे मेधा शंकर आज सोशल मीडियावर मोठे नाव बनले आहे. ती आता स्टार झाली असून तिचे फॉलोअर्स लाखोंच्या संख्येने आहेत.

Advertisement
1/9
छोट्याशा रोलसाठी डायरेक्टरची मोठी डिमांड, '12वी फेल'च्या मेधा शंकरचा कास्टिंगबद्दल धक्कादायक खुलासा
छोट्याशा रोलसाठी डायरेक्टरची मोठी डिमांड, '12वी फेल'च्या मेधा शंकरचा कास्टिंगबद्दल धक्कादायक खुलासा

12th Fail Medha Shankar: '12th Fail' हा चित्रपट सध्या सगळीकडे चर्चेत आहे. सिनेमाची कथा, त्यातील पात्र, गाणी या सर्वांबद्दलच लिहिलं, बोललं जात आहे. प्रत्येकजण सिनेमा पाहून इतरांना पाहण्यासाठी प्रोत्साहित करतोय.

2/9
नॅशनल क्रश
नॅशनल क्रश

सिनेमाची अभिनेत्री मेधा शंकरदेखील सिनेमामुळे नॅशनल क्रश बनली आहे. तिच्या फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. इंडस्ट्रीत अनेक वर्षे स्ट्रगल केल्यानंतर मेधाला यशाची किल्ली सापडली आहे. 

3/9
कास्टिंग काउचबद्दल भाष्य
कास्टिंग काउचबद्दल भाष्य

मेधा शंकरने तिला आलेल्या कास्टिंग काउचबद्दल भाष्य केले आहे. कास्टिंग काउचचे भयाण वास्तव तिने सांगितले आहे. 2020 मध्ये या चित्रपटात श्रद्धा जोशीचे कॅरेक्टर साकारताना काय अनुभव आला? ते जाणून घेऊया. 

4/9
कास्टिंग काउचची भीती
कास्टिंग काउचची भीती

12वी फेल या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री मेधा शंकरदेखील सध्या चर्चेत आहे. मला सुरुवातीपासूनच अभिनेत्री बनायचे होते पण इंडस्ट्रीतील कास्टिंग काउचची खूप भीती वाटत होती, असे तिने सांगितले. 

5/9
दिग्दर्शकांच्या मोठ्या मागण्या
दिग्दर्शकांच्या मोठ्या मागण्या

कारण अनेकदा असं होतं की, कोणतीही छोटी भूमिका मिळवण्यासाठी दिग्दर्शक अनेक मोठ्या मागण्या करतात. मला या गोष्टीला तोंड द्यायचं नव्हतं, अशा परिस्थितीत हिरोईन बनण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मी अनेक वेळा विचार केल्याचे मेधाने सांगितले.

6/9
कुटुंबाचा विरोध
 कुटुंबाचा विरोध

माझ्या अभिनेत्री बनण्याच्या निर्णयाला संपूर्ण कुटुंबाचा विरोध होता. माझ्या पालकांना अभिनयातील करिअर अजिबात आवडले नव्हते. मुंबईत येण्यासाठी मला आई-वडिलांशी खूप संघर्ष करावा लागल्याचे मेधाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले.

7/9
2020 मध्ये वाईट परिस्थिती
2020 मध्ये वाईट परिस्थिती

2020 हे वर्ष इतरांप्रमाणे मेधासाठीदेखील खूप वाईट होते. संपूर्ण देशात लॉकडाऊन होता. त्यावेळी माझ्याकडे पैसेही नव्हते. मला कोणतेही काम मिळत नव्हते. माझे जग उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटत होते अशी आठवण मेधाने सांगितली. 

8/9
3 प्रोजेक्टमधून काढले
3 प्रोजेक्टमधून काढले

अशावेळी मला 3 प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आले. पण मी हार मानली नाही आणि आज '12वी फेल' चित्रपटाने माझे नशीब बदलल्याचा आनंद मेधा व्यक्त करते. 

9/9
सोशल मीडिया सेलिब्रिटी
सोशल मीडिया सेलिब्रिटी

या सिनेमामुळे मेधा शंकर आज सोशल मीडियावर मोठे नाव बनले आहे. ती आता स्टार झाली असून तिचे फॉलोअर्स लाखोंच्या संख्येने आहेत.





Read More