PHOTOS

श्रीदेवीसोबत अफेअरच्या चर्चा ऐकून 'या' सुपरस्टार अभिनेत्याच्या पत्नीनं केलेला आत्महत्येचा प्रयत्न

अभिनेत्री श्रीदेवी ही ऑनस्क्रीन कामगिरीपेक्षा खासगी आयुष्यामुळे कायमच अधिक चर्चेत राहिली. असाच एक किस्सा तिच्यासोबत नाव जोडलं गेल्यानंतर एका अभिनेत्याच्या पतीसंदर्भातील आहे. नेमकं घडलेलं काय जाणून घेऊयात...

Advertisement
1/11

श्रीदेवीसोबत नाव जोडल्यानंतर कोणत्या अभिनेत्याच्या पत्नीनं केलेली आत्महत्येचा प्रयत्न जाणून घ्या हा रंजक किस्सा या अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त...

2/11

हिंदी चित्रपटसृष्टीमधील सर्वात नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे श्रीदेवी! तिने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. श्रीदेवी अशा मोजक्या अभिनेत्रींपैकी होती जिच्या व्यावसायिक आयुष्यासंदर्भातील चर्चेपेक्षा तिचं खासगी आयुष्य जास्त चर्चेत राहिलं.

 

3/11

एक काळ गाजवणाऱ्या श्रीदेवीचे नाव ती तिच्या कारकि‍र्दीच्या सर्वोच्च स्थानी असताना अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले. एका अभिनेत्यासोबत तर तिच्या लग्नाच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

 

4/11

श्रीदेवीने या अभिनेत्यासोबत लग्न केल्याच्या आणि अफेर असल्याच्या आणि त्यांच्या खासगी नात्याच्या बातम्या त्यावेळी सोशल मिडिया नसतानाही इतकी व्हायरल झाली की या विवाहित स्टारच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असा उल्लेख अनेक मनोरंजन विषयक वेबसाईट्सच्या वृ्त्तांकनात आहे.

 

5/11

आपण या ठिकाणी ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत त्याचं नाव आहे, मिथुन चक्रवर्ती! मिथुन चक्रवर्ती यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानेच त्यांच्या खासगी आयुष्यातील रंजक पण तितक्याच थरारक अनुभवासंदर्भात जाणून घेऊयात...

6/11

'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, जेव्हा श्रीदेवीचे नाव मिथुनशी जोडले गेले तेव्हा ते त्यांची पहिली पत्नी योगिता बालीसोबत रिलेशनशिपमध्ये होते.

 

7/11

जेव्हा योगिताला मिथुन आणि श्रीदेवीच्या कथित नात्याबद्दल बातम्यांमधून आणि चर्चांमधून कळले तेव्हा तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. असे म्हटले जाते की श्रीदेवीला मिथुन आणि योगिताच्या नात्याबद्दलची कोणतीही कल्पना नव्हती.

 

8/11

त्यानंतर श्रीदेवीने प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते बोनी कपूर यांच्याशी 2 जून 1996 रोजी लग्न केलं. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या वयात आठ वर्षांचं अंतर होतं.

 

9/11

दुसरीकडे मिथुन यांनी योगिताबरोबर लग्न केलं. योगिताने किशोर कुमार यांना घटस्फोट दिल्यानंतर मिथुनबरोबर संसार थाटला.

 

10/11

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना दोन मुली असून दोन्ही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. श्रीदेवी यांचं 2018 साली आकस्मिक निधन झालं.

 

11/11

दुसरीकडे मिथुन चक्रवर्ती यांनी मनोरंजनसृष्टीनंतर राजकारणामध्ये तृणमूल काँग्रेसच्या माध्यमातून स्थिर होण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना राजकारणात फारसं यश आलं नाही. त्यांनी आता तृणमूलची सोबत सोडून डाव्या पक्षांकडे आपला मोर्चा वळवला आहे. ते लवकरच 'बंगाल फाइल्स'मध्ये दिसून येणार आहेत.





Read More