PHOTOS

32 वर्ष जुना सर्वात फ्लॉप चित्रपट, बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच करण्यात आला बॅन

बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच प्रचंड कमाई केली. तर काही असे चित्रपट आहेत, जे प्रदर्शित होताच फ्लॉप ठरले. 

Advertisement
1/7

बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच प्रचंड कमाई करून वेगळा रेकॉर्ड बनवला. पण असे काही चित्रपट आहेत, जे प्रदर्शित होताच फ्लॉप ठरले. 

2/7

आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो 32 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे बजेट खूप मोठे होते. परंतु तो त्या वर्षातील सर्वात मोठा फ्लॉप  चित्रपट ठरला.

3/7

त्यावेळी हा चित्रपट बनवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने कमी कमाई केली. 

4/7

रिपोर्टनुसार, या चित्रपटामुळे इंडस्ट्रीला सुमारे 99.99% नुकसान झाले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरच अपयशी ठरलाच त्यासोबत त्याला बॉक्स ऑफिसवर बंदीही घालण्यात आली.

5/7

आम्ही 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'क्षत्रिय' चित्रपटाबद्दल बोलत आहोत. हा चित्रपट राजस्थानमधील दोन राजपूत कुटुंबांमधील भांडणावर आधारित होता. 

6/7

या चित्रपटाचे बजेट 5 कोटी रुपये इतके होते. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात जवळपास  2.8 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांमध्ये संजय दत्तला अटक करण्यात आली होती. 

7/7

त्यामुळे चित्रपटाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर चित्रपटाची स्क्रीनिंग बंद करण्यात आली होती. जर हा वाद झाला नसता तर हा चित्रपट त्या वर्षातील हिट चित्रपट ठरला असता. 





Read More