1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'या' चित्रपटातील अभिनेत्याने अक्षय, अजय आणि अनिल यांना टाकले होते मागे, 6 कोटींच्या बजेटमध्ये केली होती 128 कोटींची कमाई.
1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या 10 चित्रपटांमध्ये एक चित्रपट खूपच चर्चेत होता. या काळात अक्षय कुमार, गोविंदा, अजय देवगन आणि अनिल कपूर यांनी हिट चित्रपट दिले होते.
परंतु, 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटातील कलाकाराने या सर्व सुपरस्टारला मागे टाकून एक नवीन रेकॉर्ड बनवला होता. कोण आहे तो अभिनेता?
'मैं खिलाडी तू अनाडी' हा चित्रपट 1994 मधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये सहाव्या क्रमांकावर होता. या चित्रपटाने 13 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.
पाचव्या नंबरवर अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचा चित्रपट आहे. ज्याचे नाव 'लाडला' आहे. या चित्रपटाने 2.5 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये 14 कोटींची कमाई केली होती.
90 चे दशक गोविदांच्या नावावर होते. त्याचा आणि करिश्मा कपूरचा 'राजा बाबू' या चित्रपटाने 2.30 कोटींच्या बजेटमध्ये 15 कोटींची कमाई केली होती.
क्रांतिवीर हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे. ज्यामध्ये नाना पाटेकर होते. या चित्रपटाने 3 कोटींच्या बजेटमध्ये 16 कोटींची कमाई केली होती.
'मोहरा' हा चित्रपट 1994 मधील दुसरा नंबरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच 22 कोटींची कमाई केली होती.
1994 मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट 'हम आपके हैं कौन' हा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. 6 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाने 128 कोटींची कमाई केली.