काही चित्रपट असे असतात की ते रिलीज होऊन काही दिवसच प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. पण शाहरुख खानचा हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, जे प्रदर्शित होऊन देखील अनेक दिवस प्रेक्षकांच्या मनात राहतात. असाच एक शाहरुख खानचा चित्रपट आहे.
28 वर्षांपूर्वी शाहरुख खानचा एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शित होताच शाहरुखला बॉक्स ऑफिसचा किंग बनवले.
हा एक रोमांटिक चित्रपट होता. त्यावेळी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटर बाहेर रांगा लावत होते. या चित्रपटात शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत होते.
या तिघांनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर असा धुमाकूळ घातला होता की त्या चित्रपटाची आजही चर्चा आहे.
शाहरुख खानच्या या चित्रपटाचे नाव 'दिल तो पागल है' आहे. हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गाणी, अभिनय आणि संगीत हे आजही प्रेक्षकांना आवडते.
हा चित्रपट ब्लॉगबस्टर ठरला होता. रिपोर्टनुसार, प्रेक्षकांना या चित्रपटातील तिघांची जोडी खूपच आवडली होती. चित्रपटाने प्रचंड कमाई केली होती.
रिपोर्टनुसार, शाहरुख खानच्या या चित्रपटाने 9 कोटींच्या बजेटमध्ये जगभरात 71.86 कोटींची कमाई केली होती. चित्रपटाला IMDb रेटिंग 7 आहे.