बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या सुरक्षेसाठी सेटवर असायचे 50 बॉडीगार्ड. कोण आहे ही अभिनेत्री?
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार त्यांच्या अभिनयामुळे प्रचंड चर्चेत असतात. मात्र, एक अशी अभिनेत्री आहे जी तिच्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे देखील इंडस्ट्रीमध्ये प्रचंड चर्चेत होती.
या अभिनेत्रीने अनेक सुपरस्टार कलाकारांसोबत काम केलं आहे. यासोबतच तिने बॉलिवूड अभिनेता अजय देवगनसोबत ब्लॉकबस्टर चित्रपट दिला आहे.
आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची प्रसिद्ध आणि सौंदर्य क्वीन म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या राय आहे.
अभिनेत्रीचा 2008 मध्ये प्रदर्शित झालेला 'जोधा अकबर' हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, सोनू सूद यांसारख्या कलाकारांनी काम केलं आहे.
या चित्रपटातील ऐश्वर्या रायच्या पोशाखाची जोरदार चर्चा झाली. तिचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडला. या चित्रपटात तिने 200 किलोपर्यंत वजनाचे दागिने घातले होते. ज्यामध्ये 20 किलो हे खरे दागिने होते.
त्यासोबतच तिच्या अंगावर असणारे दागिने हे मोदी आणि माणिकांपासून बनवण्यात आले होते. अंगावर प्रचंड दागिने असल्यामुळे तिच्या संरक्षणासाठी 50 सुरक्षा रक्षत ठेवण्यात आले होते.
2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जोधा अकबर' या चित्रपटाने त्यावेळी मोठी कमाई केली होती. या चित्रपटाचे बजेट 45 कोटी रुपये होते. तर चित्रपटाने जगभरात 107 कोटींची कमाई केली होती.
ऐश्वर्या रायने अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे. यामध्ये अजय देवगनसोबत तिने 'हम दिल दे चुके सनम'मध्ये काम केलं आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे.