पावरफुल बाईक बनवणारी रॉयल इन्फील्ड १२ जानेवारीला भारतामध्ये नवं मॉडेल लॉन्च करणार आहे. हे रॉयल एनफील्ड हिमालयन Fi बाइक चे 2018 मॉडेल असेल.
बाईकचे अपडेटेड व्हर्जन नव्या रंगामध्ये उपलब्ध होणार आहे. ही रॉयल एनफील्ड हिमालयन कंपनीची पहिली ऑफ रोड बाईक आहे. रॉयल एनफील्ड शिवाय इतर कोणतीही कंपनी भारतीय बाजारात या किंमतीमध्ये ऑफ रोड बाईक विकत नाही.
२०१८ च्या मॉडेलसाठी इंजिनमध्ये बदल करण्यात आलेला नाही. सुरूवातीला ४११ सीसी इंजिन होते. तो २४.५ बीएचपी पॉवर आणि ३२ एनएमचा टॉर्क जनरेट करणार आहे.
बाईकच्या फ्रंट व्हिलमध्ये ३०० एमएमचा डिस्क ब्रेक आहे. सोबतच रियर व्हील मध्ये २४० एमएम चा डिस्क ब्रेक आहे.
बाईचं फ्रंट व्हील २१ इंचाचे आहे. यासोबतच मोठी विंडस्क्रीन, अधिक माहिती देणारा इंस्ट्रमेंट कल्स्टर देण्यात आला आहे.
या बाईकची किंमत १.७ लाखापासून (एक्स-शोरूम) सुरू होते. यामध्ये कंपनी अॅन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टीमचा पर्यायही देऊ शकते.